Engineering Student esakal
नाशिक

Engineering Diploma : डिप्‍लोमाची गुणवत्ता यादी 21 जुलैला; नोंदणीस मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

Engineering and Technology Diploma : दहावीनंतर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेतील पदविका (डिप्‍लोमा) अभ्यासक्रमाच्‍या नोंदणीला पुन्‍हा एकदा मुदतवाढ मिळालेली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना येत्‍या शनिवार (ता.१५) पर्यंत नोंदणी करता येणार आहे. प्रवेशाचे सविस्‍तर वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केले आहे.

येत्‍या २२ जुलैपासून कॅप राउंडच्‍या प्रक्रियेला सुरवात होणार असून तत्पूर्वी २१ जुलैला गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. (Engineering and Technology Diploma Merit List of Diploma on July 21 Extension of registration nashik)

तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता पदविका अभ्यासक्रमाची नोंदणी सुरु आहे. नाशिक विभागात २२ हजार जागा उपलब्‍ध असताना त्‍यापेक्षा अधिक अर्ज यापूर्वीच दाखल झालेले आहेत.

त्‍यातच नोंदणीला मुदतवाढ मिळाल्‍याने आणखी विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल होणार आहेत. सुधारित वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना शनिवार (ता.१५) पर्यंत नोंदणी करता येईल. ई-स्‍क्रुटीनी किंवा प्रत्‍यक्ष स्‍क्रुटीनीच्‍या माध्यमातून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यायची आहे.

यापूर्वीपर्यंत केवळ नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु आता सविस्‍तर वेळापत्रक जाहीर झाले असल्‍याने नोंदणीस आणखी मुदतवाढ मिळणार नसल्‍याचे स्‍पष्ट झाले आहे.

१७ ला तात्पुरती गुणवत्ता यादी

नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर येत्‍या १७ जुलैला तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीसंदर्भात तक्रार, हरकती नोंदविण्यासाठी १८ व १९ जुलै अशी मुदत दिली जाईल.

यानंतर २१ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, त्‍याआधारे पुढील प्रवेश फेरीतून प्रवेश दिले जाणार आहेत. तीन फेऱ्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

१७ ऑगस्‍टपासून अध्ययन

गेल्‍या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडले होते. परंतु आता यंदापासून हे वेळापत्रक पूर्वपदावर येत आहे. त्‍यानुसार आता पदविका अभ्यासक्रमाच्‍या अध्ययन प्रक्रियेला १७ ऑगस्‍टपासून सुरवात होणार आहे. ८ सप्‍टेंबरपर्यंत प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

असे आहे कॅप राउंडचे वेळापत्रक-

* पहिल्‍या राउंडसाठी पसंतीक्रम नोंदणी- २३ ते २६ जुलै

* पहिल्‍या राउंडची जागा वाटप------२८ जुलै

* निवड झालेल्‍यांना प्रवेशाची मुदत---२९ जुलै ते ३ ऑगस्‍ट

* दुसऱ्या राउंडसाठी पसंतीक्रम नोंदणी-६ ते ८ ऑगस्‍ट

* दुसऱ्या राउंडसाठी जागा वाटप-----१० ऑगस्‍ट

* निवड झालेल्‍यांना प्रवेशाची मुदत---११ ते १६ ऑगस्‍ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT