नाशिक

फलटण स्पर्धेत प्रथम क्रमांक

CD
धुळे : टुडे पान २ साठी... --- देवरे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा फलटण स्पर्धेत प्रथम क्रमांक सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : फलटण (जि. सातारा) येथील राष्ट्रीय स्तरावरील ‘इनोव्हेशन २०२६’ प्रकल्प सादरीकरण स्पर्धेत येथील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. राज्यातून आलेल्या २६१ प्रकल्पांतून या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘इनोव्हेशन’ प्रकारात पाच हजारांचे प्रथम पारितोषिक पटकावले. सीमावर्ती भागातील सैनिकांना कडाक्याच्या थंडीपासून संरक्षण मिळावे, यासाठी विद्यार्थ्यांनी ‘हेमीस्फेरीकल सेल्फ हिटेड टेन्ट फॉर डिफेन्स ॲप्लीकेशन’ हा प्रकल्प तयार केला. याद्वारे सैनिकांना आल्हाददायक तापमान व पुरेसा ऑक्सिजन मिळतो. सिद्धी किरण पाटील, चंचल राजेंद्र खैरनार, भाग्यश्री माधवराव पाटील व वैभवी मनोहर पाटील या विद्यार्थ्यांनी ही निर्मिती केली. मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. डी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प सादर झाला. कार्यशाळा अधीक्षक प्रा. डॉ. दीपक सोनवणे व प्रा. वाडे फलटण येथे उपस्थित होते. प्राचार्य प्रा. डॉ. हितेंद्र पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. इंद्रभान बोरसे, प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा. डॉ. विनोद शिंदे, प्रा. डॉ. जितेंद्र व्यास, प्रा. डॉ. अभिजीजित मोरे, प्रा. डॉ. योगेश पाटील उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष कुणाल पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष सुभाष देवरे, उद्योजक विलास देवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Election: उत्तर प्रदेशात काँग्रेसला हव्यात १०० हून अधिक जागा, नाराज अखिलेश किती जागा देणार?

Trump Modi Quad meeting: कणखर व्यक्तिमत्व! क्वाड नेत्यांच्या बैठकीत ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

FDA अधिकारी बनून पानटपरीवर धाड, बोगस अधिकाऱ्यांचा पर्दाफाश, ६ जणांना अटक; २.६६ लाखांची रोकड जप्त

Dhoni Retirement: "तू आमचा थाला अन् कर्णधार नेहमीसाठीच राहशील...", ऋतुराज गायकवाडची धोनीसाठी भावूक पोस्ट

१३ वर्षांचा वनवास संपला! नागपुरात रंगणार महाराष्ट्र केसरीचा महासंग्राम; १३०० मल्ल दाखवणार कुस्तीचा दम, 'या' तारखेला आयोजन

SCROLL FOR NEXT