नाशिक

‘सकाळ अभियंता दिन’

CD
धुळे : धुळे, नंदुरबार टुडे ३ साठी, जळगाव टुडेसाठी देणे. ---------------------- 32608, 32609 धुळे : दाते रिजन्सीतील सोहळ्यात ‘सकाळ अभियंता दिन’ विशेषांकाचे प्रकाशन करताना जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, ‘पीडब्लूडी‘चे अधीक्षक अभियंता विनोद भदाणे, ‘सकाळ''च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील, जाहिरात मुख्य व्यवस्थापक मारुती दातीर. दुसऱ्या छायाचित्रात सन्मानचिन्हाने गौरविण्यात आलेले खानदेशातील प्रतिभावंत अभियंते. शेजारी मान्यवर. (छायाचित्रे : गोरख गर्दे ) - (बातमीच्या पोटात) 32610 धुळे : कुटुंबियांसह उपस्थित सन्मानार्थी अभियंते. -- खानदेशातील कर्तृत्ववान हातांचा थाटात गौरव ‘सकाळ'' अभियंता दिन सोहळा; जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंत्यांच्या हस्ते सन्मान सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १६ : ‘सकाळ'' माध्यम समूहातर्फे येथील दाते रिजन्सीत गुरुवारी (ता. १५) दिमाखात पार पडलेल्या ‘सकाळ'' अभियंता दिन सोहळ्यात खानदेशातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रतिभावंत अभियंत्यांचा सपत्नीक यथोचित सन्मान करण्यात आला. या दिमाखदार सोहळ्याने खानदेशच्या विकासातील कर्तृत्ववान हातांचा गौरव करत संपूर्ण अभियंता वर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. राज्यात प्रथमच ‘सकाळ''च्या माध्यमातून अभियंता दिनानिमित्त झालेला असा हा सोहळा प्रशंसनीय आणि संस्मरणीय ठरल्याचा सूर उपस्थितांमध्ये उमटला. - जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद भदाणे प्रमुख पाहुणे होते. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे निवासी संपादक अभय सुपेकर, सरव्यवस्थापक संजय पाटील, जाहिरात विभागाचे मुख्य व्यवस्थापक मारुती दातीर उपस्थित होते. समाजविकासात मोलाचे योगदान देणाऱ्या अभियंत्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. खानदेशभरातून आलेले सन्मानार्थी आणि त्यांचे कुटुंबीय या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार झाले. उपस्थितांच्या टाळ्यांच्या कडकडाटात जेव्हा अभियंत्यांचा गौरव झाला, तेव्हा आप्तेष्टांच्या डोळ्यांतील कौतुकाचा ओलावा आणि चेहऱ्यावर झळकणारा अभिमानाचा व गर्वाचा क्षण सोहळ्याची उंची अधिकच वाढवून गेला. - विशेषांकाचे प्रकाशन अभियंता दिनानिमित्त ‘सकाळ''च्या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. निवासी संपादक सुपेकर यांनी प्रास्ताविकातून सोहळ्याची पार्श्वभूमी आणि भूमिका उपस्थितांसमोर विशद केली. तसेच ‘सकाळ'' माध्यम समूहाच्या सामाजिक व वैचारिक उपक्रमांची परंपरा उपस्थितांना सांगितली. सरव्यवस्थापक पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. पूनम बेडसे यांनी सूत्रसंचालन तर मुख्य व्यवस्थापक दातीर यांनी आभार मानले. - १४-१ 32611 : भाग्यश्री विसपुते १४-१ अभियंते विकासाचा पाया जिल्हाधिकारी विसपुते मनोगतात म्हणाल्या, की अभियंत्यांच्या करड्या नजरेतून आणि सृजनशील विचारांशिवाय शाश्वत विकास कधीही शक्य नाही. देशाच्या प्रगतीत अभियंत्यांचे योगदान अमूल्य असून, उभारणीचे कोणतेही काम करताना ते नेहमी पर्यावरणपूरक आणि शाश्वत होईल, याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. काळाची पावले ओळखून नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे आणि कामात परिणामकारकता आणावी. पाण्याची उपलब्ध गरज आणि त्याचा वापर यांचे सूक्ष्म भान ठेवून पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि त्याबाबत समाजात जनजागृती निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. - १४-१ 32612...विनोद भदाणे १४-१ अभियंता कधीही निवृत्त होत नाही अधीक्षक अभियंता भदाणे म्हणाले, की अभियंता हा आयुष्यभर अभियंताच असतो, तो कधीही निवृत्त होत नाही. अभियांत्रिकी ही केवळ नोकरी नसून ती त्याच्या ‘डीएनए‘मध्येच रुजलेली असते. समाज आणि विश्वातील नवनवीन सृजनशीलतेचे काम अभियंत्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेतूनच घडत असते. भगवान विश्वकर्मा यांच्यापासून ते भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांच्यापर्यंत सर्वांनीच या क्षेत्राला एक नवी उंची आणि ओळख दिली आहे. सर विश्वेश्वरय्या यांनी धुळे शहरासह जिल्ह्यात केलेले काम ऐतिहासिक आहे. सिंचन असो अथवा पाणी व्यवस्थापन, त्यांचे प्रत्येक नियोजन दीर्घकाळ टिकणारे आहे. निरादेवदर योजनेतील त्यांचे समन्यायी पाणीवाटपाचे सूत्र आजही तितकेच मार्गदर्शक ठरत आहे. - १४-१ ...चौकट... १४-१ खानदेशातील प्रतिभावंत सन्मानार्थी ‘सकाळ अभियंता दिन’ सोहळ्यात गौरविण्यात आलेले खानदेशातील सन्मानार्थी असे धुळे जिल्हा : प्रसाद जोशी, रोहित निकम, मोहित वाघ, ब्रिजलाल जाधव, संजय पाटील. जळगाव जिल्हा : अपूर्व थेपडे, देवेंद्र शिंदे, हाजी शेख कलीम खाटीक, कुलदीप पाटील, पुंडलिक पाटील, संदीप सोनवणे, सुमीत पाटील, स्वप्निल देवरे, दिनेश बोरसे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: शहरात १०% पाणीकपात, तरीही टँकरने धुतले BRT चे डिव्हायडर; नागरिकांमधून संताप

SCROLL FOR NEXT