Deepak Karanjikar esakal
नाशिक

Nashik Kala Katta: नव्या पिढीचे प्रबोधनकार : दीपक करंजीकर

सकाळ वृत्तसेवा

"आजवर आपल्या देशातील बुद्धिजीवी वर्गाने विविध विचारवंतांच्या माध्यमातून, एका विशिष्ट वैचारिक चौकटीचा आकार घेतलेला आहे. हा आकार आता माहिती आणि संकलनाचे प्रवेशद्वार ओलांडून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या एका नव्या जगात पाऊल ठेऊ पाहतो आहे. अशा बदलत्या समाजाला सामोरे जाताना, मानवाची स्वतःची विचारशक्ती, तर्कशक्ती आणि भाषा वास्तवाशी सुसंगत असण्याच्या इच्छेने ज्या विचारवंतांना सुधारणांचा लोकजागर करावासा वाटतो अशा प्रबोधनवादी विचारसरणीच्या विचारवंतांपैकी एक म्हणजे नाशिकचे दीपक करंजीकर."

- तृप्ती चावरे- तिजारे.

(Enlightener of New Generation Deepak Karanjikar nashik kala katta)

रंगभूमी, छोटा पडदा, चित्रपट, लेखन, विश्वपर्यटन, अनुभव कथन, अभिनय, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, विचारकारण, नागरिकत्व, वक्तृत्व, कला अशा विविध प्रांतात अर्थपूर्ण मुशाफिरी करणारे एक संवेदनशील कलामनाचे समाज सुधारक आहेत.

‘सकाळ’ वाचकांशी संवाद साधताना ते म्हणतात, जे, जे उत्तम आहे, उदात्त आणि उन्नत आहे, ते, ते आपण करत रहावं आणि लोकांपर्यंत पोचवावे. मग ते अभिनयाच्या माध्यमातून असो किंवा विचारांच्या. माध्यमे कोणतीही असोत, ती एकमेकांमध्ये ‘कन्व्हर्ज’ होत असतात.

प्रत्येकाच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी ‘कन्व्हर्ज’ होणे, हीच प्रबोधनाची खरी सुरवात आहे. ही सुरवात वाचकांपासूनही होत असते. आता हेच बघा ना, वर्तमानपत्र हवं ते देतं, पण आपल्याला काय हवंय ते मागणं हे वाचकांचेही काम आहे.

प्रबोधनाची सुरवात ही अशीच होत असते. ‘सकाळ’ एक दीर्घ परंपरा असलेलं प्रगल्भ विचारांचे आणि जागरूक वाचकांचे वर्तमानपत्र आहे, त्यामुळे विविध विषयांवरील प्रबोधन करणारं तेही एक सशक्त माध्यम आहे.

विविधांगी क्षेत्रात आपल्या स्वतंत्र भाषेतून वैचारिक ठसा उमटविणारे दीपकजी, माहिती, प्रबोधन, कला आणि मनोरंजन क्षेत्रांकडे विचारांचा स्रोत म्हणून बघतात. सत्तरहून अधिक देशांची भ्रमंती करून त्यांनी सर्वंकष विचारांची मोठी संपदा कमावली आहे.

ही संपदा समाजाच्या वैचारिक उत्क्रांतीसाठी विविध माध्यमातून वाटण्यासाठी ते सदैव उत्सुक व तत्पर असतात. विविध समाज माध्यमांमुळे आजच्या मानवाला स्वतःच्या आणि त्याच्या भोवतालच्या अनेक वलयांची जाणीव होते आहे.

वलयांमध्ये राहूनही वलयाबाहेरची खरी लढाई लढताना, जे प्रश्न विचारांची दिशाच बदलून टाकतात अशा प्रश्नांना दीपकजी थेट भिडतात. त्यांनी लिहिलेली ‘घातसूत्र’ जागतिक युद्ध व अर्थशास्त्रावरील मीमांसा हे याचे उत्तम उदाहरण आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

वास्तविक जागतिक व्यवस्थेविरुद्धचा संघर्ष सामान्य व साध्या-सरळ विचारसरणीच्या चौकटीत न बसणारा आहे, कारण जागतिक घडामोडींचा आपल्याशी काय संबंध, असेच बहुतांशी लोकांना वाटत असते.

परंतु करंजीकरांचे विचार ऐकून आणि वाचून सामान्य नागरिकाच्याही मनात जागतिक पडद्यावरील राजकारणाचा अभिनय नाचू लागतो आणि एक नवा विचारसंघर्ष उभा राहतो.

जागतिक घडामोडीमागचे अभिनयसूत्र दीपकजींना उमगले कारण त्यांच्या आतमधला अभिनेता हा कुठल्याही क्षेत्रातील अभिनयाचे निरीक्षण करण्याइतका प्रगल्भ झाला आहे.

अभिनयाचा पडदा आणि जगाचा पडदा याकडे तुम्ही कसे बघता, या मजेशीर प्रश्नाचे उत्तर त्यांनी तितक्याच गांभीर्याने दिले. ते असे की, अभिनयाच्या पडद्याचा कॅनव्हास हा ठाम आणि न बदलणारा असतो.

जागतिक पडद्याचे तसे नसते. हा कॅनव्हास सतत बदलणारा असतो. अभिनेता म्हणून मी पाहिलेला पडदा हा संहितेबरहुकूम चालणारा पडदा आहे, परंतु जागतिक घडामोडींच्या पडद्यावरचा प्रत्येक सीन हा वेगळा, अपडेटेड आणि बदलणारा आहे ही अजब गोष्ट माझ्या लक्षात आली.

अभिनयाच्या पडद्यावर एक कॅरॅक्टर म्हणून भूमिका साकारणे वेगळं आणि जगाच्या पडद्यावर स्पंज बनून विचार शोषत राहणं वेगळं. ‘केल्याने देशाटन, मनुजा येते शहाणपण’ म्हणीप्रमाणे मी अनेक देशांचे अनेक पडदे आणि त्यामागचे बदलणारे कॅनव्हास जवळून अनुभवले.

‘याही क्षेत्रात अभिनय आहे’ असे जाणवल्यावर माझे कुतूहल वाढत गेले आणि त्या प्रत्येक कुतूहलाच्या मुळाशी जाण्याचे मी ठरविले.

आजवर अनेक प्रबोधनपर्वांच्या साक्षीने मानवाचा विचारपरीघ विस्तारत गेला आहे. दीपक करंजीकर असाच एक नवीन परीघ विस्तारणारे विचारवंत. त्यांना अधिक जाणून घेऊया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT