Entrance of ZP Primary School in Gorane locked Locks  esakal
नाशिक

Nashik: गोराणेतील ZP प्राथमिक शाळेच्या प्रवेशव्दाराला ठोकले कुलूप; शिक्षकांच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर उघडले कुलूप

- दीपक खैरनार

अंबासन, (जि.नाशिक) : गोराणे (ता.बागलाण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेल्या अनेक वर्षांपासून वर्गवारीनुसार शिक्षक नसल्याने शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गुरूवार (ता.३०) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील व्दितीय सत्रातील पहिल्याच दिवशी शिक्षक मिळावेत यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून तसेच पालकांनी टाळे ठोकले.  (Entrance of ZP Primary School in Gorane locked Locks opened after temporary appointment of teachers Nashik)

यामुळे पहिल्या दिवशी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची बाहेरील वऱ्हांड्यात शाळा भरविण्यात आली होती.

गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सातवीपर्यंत वर्ग असून वर्गवारीनुसार शिक्षक मिळावेत यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडून तसेच पालकांकडून शिक्षण विभागात मागणी केली जात होती. तसेच मुंबई येथील मंत्रालयात शिक्षण विभागातील दालनात याबाबत शिष्टमंडळाने भेट देऊन पत्रव्यवहार केले होते.

दरम्यान अनेक वेळा शिक्षण विभागात पत्रव्यवहार करून दखल घेत नसल्याने संतप्त पालकांसह ग्रामपंचायत प्रशासनाकडून दिवाळीच्या सुट्टीनंतर व्दितीय सत्रातील पहिल्याच दिवशी प्रवेशव्दारावरील गेटला टाळे ठोकले व जोपर्यंत शिक्षक मिळत नाहीत तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला होता.

यामुळे पहिल्या दिवशी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची बाहेरील वऱ्हांड्यात शाळा भरविण्यात आली होती. गटशिक्षण आधिकारी चित्रा देवरे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने एका वस्तीशाळेतील शिक्षकाची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केल्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास उपस्थित ग्रामस्थांकडून कुलूप उघडण्यात आले.

या शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणासह विविध उपक्रम राबविण्यात येण्यासाठी तसेच जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.

यावेळी सरपंच दिनेश देसले, चिंतामण देसले, बाळू जाधव, कारभारी देसले, विश्वास देसले, यशवंत देसले, सुनील जाधव, युवराज देसले, दिलीप देसले, विनायक देसले, महेंद्र देसले, किरण वाघ, सोमनाथ कापडणीस, राजेंद्र पोपट भदाणे, प्रभाकर देसले व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयवंत देेेेसले उपस्थित होते.

"अनेक दिवसांपासून आम्ही मागणी करतो आहोत की सात वर्गांना सात शिक्षक दिले पाहिजेत पण शिक्षण विभाग पटसंख्येचे कारण दाखवून विषय टाळत होते म्हणून आम्ही आज जिप मराठी शाळेला कुलूप लावून घेतले शिक्षण विभागास शाळा चालवणे परवडणारे नसेल तर जि प शाळा बंद करून घेतल्या पाहिजेत पण विनाकारण गरीब जनतेवर उपकार केल्यासारखे शिक्षण विभागाने वागू नये."- दिनेश बापू देसले, सरपंच गोराणे

"शिक्षण विभागाचा अतिशय भोंगळ कारभार आहे. भावी पिढीचे शैक्षणिक नुकसान शिक्षण विभागाने करू नये गरीब विद्यार्थी मोठ्या आशेने जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात पण शिक्षकांअभावी त्यांचे मोठे नुकसान होते आहे. शिक्षण विभागाने दखल न घेतल्यास गोराणे जिल्हा परिषद शाळेस कुलूप लावून सात वर्गांना सात शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा चालू  होऊ देणार नाही." - यशवंत देसले, ग्रामपंचायत सदस्य, गोराणे

"मागील काळात आम्ही गावकऱ्यांनी स्वखर्चातून वस्ती शाळेसाठी जागा विकत घेऊन जिल्हा परिषद शाळेला दान केली अनेक प्रयत्न करून शाळेची इमारत बांधली तेथे चांगल्या पद्धतीने वस्तीवरच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं या हेतूने ती शाळा चालू केली, पण आज शिक्षण विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शाळा बंद होण्याच्या दारावर आहे आणि शिक्षण विभाग वस्ती शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे, तसं केल्यास त्याचे परिणाम शिक्षण विभागाला भोगावे लागतील आम्ही तसे होऊ देणार नाही."

 - चिंतामण पुंडलिक देसले, ज्येष्ठ नागरिक, गोराणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Code of Conduct: 'आमदार आले की उभं राहा'! महाराष्ट्र सरकारचा अधिकाऱ्यांना अजब आदेश; नियम मोडल्यास कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : सपा नेते अबू आझमी यांचे गोवंडी मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आंदोलन

Pimpri Chinchwad News : अवजड वाहने, खड्डे ठरतायत ‘काळ’; हिंजवडी–ताथवडे पट्ट्यात महिनाभरात दोघींचा मृत्यू!

Sweetlime Rate Decrease : मोसंबी नऊशे रुपये, तर कापुस सात हजार रुपये प्रति क्विंटल

Gadchiroli Premier League: गडचिरोलीत पुन्हा रंगणार क्रिकेटचा उत्सव; महिला क्रिकेट संघाचाही होणार समावेश!

SCROLL FOR NEXT