CM Eknath Shinde Group News esakal
नाशिक

Nashik Political News : सोमवारी मुख्यमंत्र्यांबरोबर जेवण अन् मंगळवारी प्रवेश!

प्रवेशकर्ते माजी नगरसेवक वाजतगाजत येणार शहरात

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेचे दहाहुन अधिक माजी १२ नगरसेवकांचा प्रवेश निश्चित झाला असून, २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत संध्याकाळी आलिशान हॉटेलमध्ये जेवण, तर २९ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रवेश करण्याचे नियोजन आहे. जून महिन्यात राज्यात सत्तांतर घडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या समर्थकांचे राज्य व प्रत्येक जिल्ह्यात व शहरात संध्याकाळी प्रवेश करण्याचे नियोजन करत आहे. (entry of more than 10 former 12 corporators of NMC been confirmed to join CM eknath shinde group nashik political News)


नियोजनाच्या पहिल्या टप्प्यात नाशिकमध्ये शिंदे गटाला फारसे यश मिळाले नाही. खासदार हेमंत गोडसे, पालकमंत्री दादा भुसे, नांदगावचे आमदार सुहास कांदे त्यांच्या व्यतिरिक्त स्ट्रॉँग असा नेता शिंदे गटात सहभागी झाला नाही. सत्तेत येऊन चार महिने संजय गटात स्ट्राँग नेते सहभागी होत नसल्याने स्थानिक पातळीवर जबाबदारी घेतलेल्या शिंदे समर्थक नेत्यांवरदेखील दबाव होता. शिंदे गटात प्रवेश करण्याचे अनेकांना निमंत्रण आहे.

परंतु राजकीय भवितव्य काय या विषयावरून संभ्रम आहे. माजी नगरसेवकांना गळाला लावण्याच्या प्रयत्नात हाच सवाल विचारला जात आहे. त्यामुळे आता शिंदे गटाकडून थेट कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे निवडून येण्याचा विश्वास असलेले बारा नगरसेवक येत्या मंगळवारपर्यंत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

हेही वाचा :मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

जोरदार शक्तीप्रदर्शन

सोमवारी मुख्यमंत्र्यांबरोबर हॉटेलमध्ये जेवण घेतल्यानंतर प्रभागातील विकास कामासंदर्भात तसेच निधी उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा केली जाईल. याच बैठकीत प्रमुख प्रश्‍नासंदर्भातदेखील चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी प्रवेश झाल्यानंतर सर्व माजी नगरसेवक तसेच अन्य पक्षातून शिंदे गटात प्रवेशकर्ते झालेल्या पदाधिकाऱ्यांचा एकत्रित ताफा नाशिकमध्ये एन्ट्री करेल.

पाथर्डी फाटा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर शालिमारच्या शिवसेना भवनला गरका मारून छत्रपती शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्याचे नियोजन आहे. वाहनांच्या ताफ्याच्या माध्यमातून नाशिक शहरांमध्ये शिंदे गटाचे शक्तीप्रदर्शन होईल.

सत्तेत वाटेकरी झाल्यास

महापालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गटाची सत्ता आल्यास किंवा जे काही नगरसेवक निवडून येतील. त्यांच्यातून महापौर व उपमहापौर तसेच स्थायी समिती सभापती व गटनेते, विविध विषय समित्या, गटनेते पद आदींची बोलणी केली जाणार असल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT