नाशिक

पर्यावरण रक्षणाशिवाय मानवतेचे रक्षण अशक्य केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांचे प्रतिपादन

CD
मेनफिचर शहर टुडे पान तीनसाठी NSK26H34293 जळगाव : आरोग्य भारतीतर्फे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण कार्यशाळेत दीप प्रज्वलन करताना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ. सोबत उपस्थितीत इतर मान्यवर. ------------ पर्यावरण संरक्षणाशिवाय मानवतेचे रक्षण अशक्य ----- केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ : राष्ट्रीय पर्यावरण कार्यशाळेत मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२ : पर्यावरणाचे रक्षण केल्याशिवाय मानवतेचे रक्षण शक्य नाही. पर्यावरण संवर्धन करणे, ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. भारतीय संस्कृतीच्या कणाकणात पर्यावरण रक्षणाचा भाव सामावलेला आहे. आपले सणोत्सवही निसर्ग संवर्धनाचा संदेश देतात, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी केले. येथील इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए)च्या सभागृहात आरोग्य भारतीतर्फे आयोजित राष्ट्रीय पर्यावरण कार्यशाळेच्या उद् घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पद्मश्री चैत्राम पवार होते. यावेळी भारत सरकारचे माजी आयुष सल्लागार तथा आरोग्य भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. अशोक कुमार वार्ष्णेय, राष्ट्रीय महासचिव सुनील जोशी, राष्ट्रीय पर्यावरण प्रमुख प्रवीण प्रभाकर, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, प्रांत उपाध्यक्ष डॉ. लीना पाटील यांच्यासह पर्यावरणतज्ज्ञ, वैज्ञानिक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ....... निरोगी आरोग्यासाठी शुद्ध पर्यावरण आवश्यक आरोग्य भारतीचे राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. अशोक कुमार वार्ष्णेय यांनी सांगितले, की प्रत्येक व्यक्ती व कुटुंब निरोगी राहावे, त्यातून सुदृढ भारताची निर्मिती व्हावी, हे आरोग्य भारतीचे उद्दिष्ट आहे. निरोगी आरोग्यासाठी शुद्ध पर्यावरण आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात छोटे-छोटे बदल करावेत. ........ पर्यावरणविषयक मार्गदर्शन या राष्ट्रीय कार्यशाळेत एकूण पाच सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या सत्रांत विविध पर्यावरणतज्ज्ञ व तज्ज्ञ वक्त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले. यात गुजरातमधील धर्मेंद्र पारिख, जळगावचे विशाल सोनकुळ, गुजरातचे राजूभाई ठक्कर, मध्य प्रदेशातील नीमच येथील आशीष जोशी व मुंबईचे आशीष मंडलोई यांच्यासह विविध मान्यवरांचा सहभाग होता. ......... पर्यावरण दिग्दर्शिकेचे प्रकाशन या कार्यशाळेच्या उद् घाटनप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री सेठ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पर्यावरण दिग्दर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाबाबत आवश्यक माहिती व मार्गदर्शन या दिग्दर्शिकेत समाविष्ट करण्यात आले आहेत. यावेळी पर्यावरणविषयक प्रदर्शनाचे उद् घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ....... पर्यावरण योद्ध्यांचा सन्मान पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या जळगावातील पर्यावरण योद्ध्यांना केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ यांच्या हस्ते पर्यावरण सन्मान प्रदान करण्यात आला. यात डॉ. सोनाली महाजन, डॉ. राहुल महाजन, डॉ. महेंद्र कबरा, डॉ. रेणू नवाल, शुभम वाणी, मदन लाठी व सुहास दुसाने यांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी आरोग्य भारतीचे जळगावचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, रेवती याज्ञिक, सचिव भूषण क्षत्रिय, महेश जैन, तुषार चौधरी, डॉ. निष्ठा लोटवाला व कुणाल महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

Lanja Machal ST Bus Service Historic Event : स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर कोकणातील ३५०० फूट उंचीवरील दुर्गम 'माचाळ' गावात पहिल्यांदाच धावली लालपरी

मला लहानपणापासूनच लग्न करायचं होतं पण... अजूनही अविवाहित का आहे ३४ वर्षांची वैदेही परशुरामी? म्हणते- मी प्रेमात पडले...

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

FD Rates: सरकारी बँकेने FD वरील व्याजदर वाढवले; नवीन योजनाही सुरू! ज्येष्ठ नागरिकांना मिळणार इतकं व्याज, दिवाळीआधी गुंतवणुकीची संधी?

SCROLL FOR NEXT