Band squad of Espalier School Neighboring Guardian Minister Dada Bhuse esakal
नाशिक

PM Modi Nashik Visit : ‘इस्‍पॅलियर’च्‍या बॅन्ड पथकाने ‘रोड-शो’मध्ये वेधले सर्वांचे लक्ष

प्रयोगशील शाळा म्‍हणून ओळख असलेल्‍या इस्‍पॅलियर स्‍कूलच्‍या बॅन्ड पथकानेदेखील शुक्रवारी (ता. १२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या रोड-शोमध्ये सहभाग नोंदविला.

सकाळ वृत्तसेवा

PM Modi Nashik Visit : प्रयोगशील शाळा म्‍हणून ओळख असलेल्‍या इस्‍पॅलियर स्‍कूलच्‍या बॅन्ड पथकानेदेखील शुक्रवारी (ता. १२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या रोड-शोमध्ये सहभाग नोंदविला.

ड्रमसह विविध वस्‍तूंपासून साकारलेल्‍या या चिमुकल्‍यांच्‍या बॅन्ड पथकाचे सादरीकरण सर्वांसाठी लक्षवेधी ठरले. (Espalier School band team participated in Prime Minister Narendra Modis road show nashik news)

छत्रपती संभाजीनगर मार्गावरील या रोड-शोदरम्‍यान सकाळी इस्‍पॅलियर स्‍कूलच्‍या विद्यार्थ्यांचे हे बॅन्ड पथक उपस्‍थित होते. शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांच्‍या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

या वेळी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे यांनी आवर्जून भेट देताना सादरीकरणाचे तोंडभरून कौतुक केले. ‘सुनो गौरसे दुनिया वालो...’ यांसह इतर विविध देशभक्तिपर गीते तालासुरात वाजविताना लक्ष वेधले होते.

बॅन्ड पथकाचे वैशिष्ट्ये म्‍हणजे वादनासाठी रंगांच्‍या व इतर टाकाऊ बाटल्‍यांचा उपयोग केलेला असून, त्‍यावर सामाजिक संदेशदेखील लिहिलेला आहे.

त्‍यामुळे पुन्हा उपयोग करताना या विद्यार्थ्यांकडून सादरीकरणादरम्‍यान जनजागृती करत दुहेरी उद्देश साध्य केला जातो आहे. शाळेचे संस्‍थापक सचिन जोशी यांच्‍या संकल्‍पनेतून बॅन्ड पथकाची स्‍थापना झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : हृदयविकाराचा झटका अन् उपचार ॲसिडिटीचा; अवघ्या दोन तासांत तरुणाचा मृत्‍यू

Solapur Accident: आंबेगावच्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू; मध्यरात्री पिकअप बुलेटची भीषण धडक, यात्रेहून येताना काळाचा घाला!

पाकड्यांचा 'बेगानी शादी में, अब्दुल्ला दिवाना' प्रकार! मोहसिन नक्वी यांची T20 World Cup न खेळण्याची धमकी; म्हणतात, बांगलादेश...

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषदेचे रणांगण! अर्ज भरण्यासाठी आजपासून झुंबड; पक्षांच्या पातळीवर जोर-बैठकांचा धडाका

Social Humiliation : दलित तरुणासोबत अमानुष कृत्य ! मिशा कापल्या, मुंडण करुन चेहऱ्याला फासला चिखल; व्हिडिओ बनवला अन्...

SCROLL FOR NEXT