This is the red light car with sirens. esakal
नाशिक

Nashik Political News : शिंदे गटातील जाधवांना लाल दिव्याचा मोह आवरेना; सायरन वाजवत गाडी सुसाट

विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्ग आता नसल्यात जमा झाला असताना कोरोनाकाळात ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी पुरवठादारांना वाहनावर लाल दिवा व सार्वजनिक ठिकाणी सायरन वाजविण्यासाठी दिलेल्या परवानगीचा अजूनही लाभ घेतला जात आहे. नुकतेच शिंदे गटात गेलेले माजी नगरसेवक अमोल जाधव यांची इंदिरानगर भागातून सायरन वाजवत जाणारी लाल दिव्याची ‘थार' कार सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (ex corporator amol jadhav of Shinde group Even after end of covid red light car continues to blare with sirens Nashik News)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

कोरोना दुसऱ्या लाटेत रुग्णालयांमध्ये रुग्णालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असंख्य रुग्णांना प्राणवायूसाठी झटावे लागले. ऑक्सिजन पुरवठादार मोजक्या कंपन्या व त्यातही त्यांच्याकडील ऑक्सिजन संपुष्टात आल्याने या कंपन्यांचे महत्त्व वाढण्याबरोबरच ऑक्सिजन कंपनी पुरवठादारांनादेखील धोका निर्माण झाला.

या पार्श्‍वभूमीवर संरक्षण पुरविण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी वाहनांवर रुग्णवाहिकाप्रमाणे लाल दिवा व सायरन बसविणे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार पिनॅकल इंडस्ट्रीजचे पार्टनर व माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी त्यांच्या थार कारवर (एमएच- १५- एचएच- ३००१) लाल दिवा लावण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणाहून मार्गक्रमण करताना सायरन वाजविण्यास परवानगी घेतली.

परंतु कोविडची तिसरी लाट नाशिकमधून पूर्णपणे ओसरली आहे. मार्च महिन्यानंतर अपवाद वगळता एकही रुग्ण आढळला नाही. या परिस्थितीत लाल दिवा काढून घेण्याबरोबरच सायरन वाजविणे बंद करणे अपेक्षित असताना किंवा शासनाकडे विनंती करणे अपेक्षित असताना जाधव यांच्याकडून आजही लाल दिव्यासह सायरनचा वापर होत असल्याने लाल दिव्याचा जाधव यांचा मोह इंदिरानगर परिसरात चर्चेचा व वादाचा विषय ठरला आहे.

"कोरोनाकाळात शासनाने परिपत्रक काढून लाल दिवा व सायरन बंधनकारक केला. आरटीओकडे पत्र रद्द करण्याची मागणी केली आहे. कोरोनाकाळात अत्यावश्‍यक बाब म्हणून दीड ते दोन किलोचे ऑक्सिजन सिलिंडर पोचविण्यासाठी लाल दिवा व सायरनचा वापर केला."
- अमोल जाधव, माजी नगरसेवक व संचालक पिनॅकल इंडस्ट्रीज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT