27017 : हेमवती कुऱ्हाडे
27018
पान तीन मेन
----------------
परीक्षेत विद्यार्थ्यांची गोपनीयता जपणाऱ्या खुर्चीला ''डिझाईन पेटंट''
शिक्षिका डॉ. हेमवती कुऱ्हाडे यांच्या संशोधनाची केंद्र सरकारकडून दखल
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ४ : परीक्षागृहात विद्यार्थ्यांची गोपनीयता, एकाग्रता आणि शिस्त कायम राहावी, या उद्देशाने पारेगाव (ता. चांदवड) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या उपक्रमशील शिक्षिका डॉ. हेमवती कुऱ्हाडे यांनी विकसित केलेल्या ‘परीक्षा गोपनीयता खुर्ची’ या अभिनव डिझाईनला भारत सरकारच्या पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सच्या ''कंट्रोलर जनरल ऑफीस''कडून डिझाईन पेटंटची मान्यता मिळाली आहे. हा प्रयोग भविष्यात पारदर्शक व सुरळीत परीक्षा पद्धतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
प्रत्यक्ष शालेय अनुभवातून निर्माण झालेल्या या संकल्पनेला बौद्धिक संपदा संरक्षण मिळाले आहे.
ही खुर्ची केवळ पारंपरिक आसनाचा भाग नसून, परीक्षेच्या विशेष गरजा लक्षात घेऊन विकसित केलेली स्वतंत्र रचना आहे. विद्यार्थ्याला प्रश्नपत्रिका सोडवताना स्वतंत्र कार्यक्षेत्र मिळावे, शेजारील विद्यार्थ्यांमुळे लक्ष विचलित होऊ नये आणि परीक्षेदरम्यान आवश्यक ती वैयक्तिक गोपनीयता जपली जावी, या मुख्य हेतूने ही डिझाईन साकारण्यात आली आहे.
येवला येथील रहिवासी असलेल्या डॉ. हेमवती कुऱ्हाडे या पारेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत कार्यरत असून, शैक्षणिक विकासासोबत शिक्षण क्षेत्रात सातत्याने नवोपक्रम राबवण्यावर त्यांचा भर असतो. त्याच्या या उपक्रमासाठी बाभूळगाव येथील एस. एन. डी. तंत्रनिकेतनच्या यंत्र अभियांत्रिकी विभागाचे संदीप आसुदे, किरण खोकले, संतोष माकूने, नवनाथ बोळीज, अमोल बर्डे, मोईज शेख आणि साईप्रसाद शिंदे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले.
-------
डिझाईन पेटंटमुळे काय साध्य होणार?
या संकल्पनेच्या दृश्य स्वरूपातील वैशिष्ट्यपूर्ण डिझाईनला बौद्धिक संपदा संरक्षण मिळाले आहे. त्यामुळे ही संकल्पना प्रत्यक्ष परीक्षेच्या वातावरणातील गरज लक्षात घेऊन विकसित केलेल्या नावीन्यपूर्ण आसनरचनेच्या स्वरूपात अधोरेखित झाली आहे. पारंपरिक बाक व खुर्चीच्या तुलनेत विद्यार्थ्याला अधिक स्वतंत्र जागा आणि गोपनीय वातावरण देणे, हा या डिझाईनचा मुख्य हेतू आहे.
----
वर्ग खोलीतील समस्येतून आकारास आलेले पेटंट
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होणे, शेजारील विद्यार्थ्यांकडे अनावश्यक दृष्टीसंपर्क होणे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कार्यक्षेत्राची गरज भासणे, या व्यावहारिक समस्या डॉ. कुऱ्हाडे यांनी अध्यापनादरम्यान जवळून अनुभवल्या. त्यावर पारंपरिक उपायांपेक्षा वेगळा विचार करत त्यांनी या विशेष खुर्चीची संकल्पना मांडली. शाळेतील प्रत्यक्ष समस्येपासून सुरू झालेला हा प्रयोग पुढे नावीन्यपूर्ण डिझाईनच्या निर्मितीपर्यंत आणि अखेर डिझाईन पेटंटच्या मान्यतेपर्यंत पोहोचला.
परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांची एकाग्रता, गोपनीयता आणि लिखाणातील अडथळे वेळोवेळी जाणवल्याने त्याचा सखोल अभ्यास करून ''परीक्षा गोपनीयता आसना''ची संकल्पना विकसित केली. या संकल्पनेला डिझाईन पेटंट मिळाल्याचा आनंद आहे. प्रत्यक्ष शैक्षणिक समस्येतूनही मोठा नवोपक्रम घडू शकतो, असा विश्वास दृढ झाला आहे.
- डॉ. हेमवती कुऱ्हाडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.