धुळे : टुडे पान २ साठी...
---
फोटो क्रमांक : 35139
धुळे : विद्याधन महाविद्यालयात झालेल्या परीक्षा पद्धती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. योगेश पाटील. शेजारी डॉ. के. बी. पाटील, हर्षल पाटील, डॉ. जागृती पाटील, डॉ. सदाशिव सूर्यवंशी आदी.
---
उत्तरपत्रिकेवर निशाणी अक्षर लिहिणे टाळा
डॉ. पाटील : विद्याधन महाविद्यालयात परीक्षा पद्धतीवर कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १७ : उत्तरपत्रिकेवर कोणतीही निशाणी किंवा देव-देवतांचे अक्षर लिहिणे गैरप्रकार ठरतो. विद्यार्थ्यांनी याची दक्षता घेऊन तणावमुक्त वातावरणामध्ये परीक्षा द्यावी, असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी केले.
वलवाडी (ता. धुळे) येथील शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्याधन महाविद्यालयात परीक्षा पद्धतीवर झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, संस्थेचे सचिव हर्षल पाटील, संचालिका डॉ. जागृती पाटील, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, डॉ. भदाणे, डॉ. सतीश शिंदे, डॉ. मून, डॉ. पालवे, डॉ. योगेश बोरसे, डॉ. मंजूषा पवार, प्रा. कविता पाटील, प्रा. प्रियंका घरोटे, प्रा. करिष्मा पाटील, प्रा. भूषण पाटील, प्रा. दिव्या पाटील, प्रा. दीपाली काकुळते, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. तेजश्री त्रिभुवन, प्रा. सायली चौधरी, प्रा. दर्शना पटेल, प्रा. दीक्षा सोनवणे, प्रा. हेमांगिनी चौधरी, आकाश उफाडे, प्रथमेश शर्मा, दीपक पवार, सोनल पाटील, पूनम पाटील, सागर मासुळे, चुडामण ठाकरे आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, की परीक्षा अर्ज भरताना नाव व विषय तपासून घ्यावेत. परीक्षा दालनात हॉलतिकीट व ओळखपत्राशिवाय साहित्य बाळगू नये. कनिष्ठ पर्यवेक्षकाची सही हॉलतिकीटवर करून घ्यावी. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज मुदतीत भरावा. निवृत्तीमुळे प्राध्यापकांची संख्या कमी असल्याने उत्तरपत्रिका तपासणीला उशीर होतो. त्यामुळे प्राध्यापकांनी जास्तीचा वेळ देऊन सहकार्य करावे, जेणेकरून निकाल वेळेत लागतील. सुटीच्या कालावधीत परीक्षेचे काम राहणार नाही, अशी वेळापत्रकाची रचना केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. दीपाली पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अतुल ठाकरे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.