EXAM esakal
नाशिक

CET Exam : व्‍यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी परीक्षा सक्‍तीची

विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार असून, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेश प्रक्रियेकरिता सीईटी परीक्षा नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

CET Exam : विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार असून, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्‍या प्रवेश प्रक्रियेकरिता सीईटी परीक्षा नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

याअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना ऐच्‍छिक अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे. (Examination is compulsory for admission to professional courses CET exam nashik news)

दरम्‍यान विविध शिक्षणक्रमांसाठी १९ सीईटी परीक्षांचे आयोजन सीईटी सेलतर्फे केले जाणार आहे. व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी आयोजित केल्‍या जाणाऱ्या सीईटी परीक्षांचे संयोजन सीईटी सेलतर्फे केले जाते. विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षांच्‍या अभ्यासाचे नियोजन करता यावे, या उद्देशाने यापूर्वीच संभाव्‍य तारखांची घोषणा विभागातर्फे केली होती. आता जानेवारीपासून विविध परीक्षांच्‍या नोंदणीला टप्‍याटप्‍याने सुरवात होत आहे.

या नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील सूचना संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. सीईटी परीक्षेसाठी अर्ज करताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांना युझर आयडी तयार करायचा असून, परीक्षेपासून निकालापर्यंत या युझर आयडीच्‍या साहाय्याने माहिती प्राप्त करून घेता येणार आहे. सुरवातीला पहिल्‍या टप्यांत १० जानेवारीपासून नोंदणी प्रक्रियेला सुरवात झालेली आहे. काही अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीची प्रक्रिया येत्‍या आठवड्यात सुरु होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत अशी

बी.एड-एम.एड-------------२९ जानेवारीपर्यंत

एम.एड.-------------------२९ जानेवारीपर्यंत

बी.एड.--------------------३० जानेवारीपर्यंत

एलएलबी (३ वर्षे)-------३१ जानेवारीपर्यंत

बीए, बीएस्सी बी.एड.----१२ फेब्रुवारीपर्यंत

एलएलबी (५ वर्षे)-------१८ जानेवारी ते १८ फेब्रुवारी

एमबीए------------------३१ जानेवारीपर्यंत

एमएचटी-सीईटी--------१६ जानेवारी ते १ मार्च

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT