Raja Ravi Verma Art Exhibition esakal
नाशिक

Raja Ravi Verma Art Exhibition: राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन 6 सप्टेंबरपर्यंत खुले

सकाळ वृत्तसेवा

Raja Ravi Verma Art Exhibition : प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेली अनेक चित्रे अजरामर झाली आहेत. प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन ६ सप्टेंबरपर्यंत सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंत पाहता येणार आहे.

शहरातील इंडेक्स आर्ट गॅलरी तिडके कॉलनीत प्रदर्शन इंडेक्स आर्ट गॅलरीचे रुचिर पंचाक्षरी यांनी भरविले असल्याची माहिती प्रदर्शनाच्या कला प्रबंधक प्रा. स्नेहल तांबुळवाडीकर- खेडकर यांनी दिली. प्रदर्शन सर्वांसाठी खुले आणि निःशुल्क आहे. (Exhibition of paintings by Raja Ravi Verma open till September 6 nashik)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

१८९४ मध्ये शिकागो येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाला पाठवलेल्या आणि प्रसिद्ध असलेल्या चित्रांचा यात समावेश आहे. प्रदर्शनात वर्मा यांची दृष्टी, स्त्री जीवनाचे सुक्ष्म निरीक्षण आणि संस्कृतीच्या विविध पैलूवर स्त्री चित्रांचा प्रभाव, अनेक प्रसिद्ध चित्रांचा समावेश, ‘स्त्री’ चित्रांवर भर देण्यात आला आहे.

येत्या काळात आणखी दोन प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे. प्रदर्शनात मांडलेल्या चित्रांमध्ये मल्याळी स्त्री, विचारात मग्न असणारी स्त्री, दारिद्र्य अधोरेखित करणारी स्त्री, बॉम्बे गायिका, इंदिराबाई मुळगावकर यांचे व्यक्तिचित्र, मलबारची स्त्री, आरशात बघणारी स्त्री, स्नान घाटावर असलेली स्त्री, मनात अनेक अपेक्षा घेऊन उभी असलेली स्त्री, वाद्य वाजवणारी स्त्री आहे.

सोबतच वर्मा यांनी काढलेले अखेरचे चित्र असे मानले जात असलेले ‘कादंबरी हे चित्र सुद्धा मांडले आहे. ‘बघ बाबा आले’ या चित्रात वर्मा यांनी आपली मोठी मुलगी महाप्रभा आणि तिचा मुलगा मार्तडा वर्मा यांना रेखाटले आहे. बघ बाबा आले आणि बॉम्बे गायिका ही शिकागो येथे प्रदर्शनासाठी पाठवण्यात आलेली चित्रे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Fuel Saving Appeal : PM मोदींच्या 'इंधन बचती'च्या सल्ल्याला घरचा आहेर? 500 गाड्यांचा ताफा काढून भाजप नेत्याचे शक्तिप्रदर्शन!

Virat Kohli ने ज्या मॉडेलची पोस्ट लाईक केली होती, तिचा खळबळजनक दावा; म्हणाली, 'मला पैशांचं आमिष दाखवलं'

Mumbai News: पालिका शाळेत संविधानाचे धडे, शिक्षण समितीसमोर अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव

Latest Marathi News Live Update : नीट पेपर फूट प्रकरण, १६ संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात

Navi Mumbai: नवी मुंबईत २४ तास पाणीपुरवठा कपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT