kisan-rail.jpg
kisan-rail.jpg 
नाशिक

किसान एक्स्प्रेससह पार्सल गाड्यांचा विस्तार; व्यापारी, बाजार समित्यांना होणार लाभ 

चेतन चौधरी

भुसावळ/नाशिक : शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून वाढता प्रतिसाद लक्षात घेता, मध्य रेल्वे प्रशासनकडून किसान एक्स्प्रेस आणि पार्सल गाडीचा विस्तार करण्यात आला आहे. 

किसान एक्स्प्रेस आणि पार्सल गाडीचा विस्तार
देवळाली-मुजफ्फरपूर किसान पार्सल गाडी (००१०७ व ००१०८) ही ३१ मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही गाडी नाशिक, लासलगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुऱ्हाणपूर, खंडवा या स्थानकांवर थांबेल. सांगोला-मनमाड, सांगोला- शालिमार, सांगोला- शालिमार -सांगोला या किसान पार्सल लिंक गाड्या, तसेच मुंबई-शालिमार- मुंबई पार्सल गाडीही ३१ मार्चपर्यंत चालवण्यात येणार आहे.

व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांना लाभ

मुंबई-शालिमार- मुंबई पार्सल गाडी नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा या स्थानकावर थांबेल. तसेच, पोरबंदर -शालिमार- पोरबंदर पार्सल गाडीदेखील १ एप्रिलपर्यंत चालवण्यात येणार आहे. ही गाडी भुसावळ, अकोला, बडनेरा येथे थांबेल. किसान एक्स्प्रेस आणि पार्सल गाड्यांना मुदतवाढ देण्यात आल्याने शेतकरी, कार्गो एग्रीग्रेटर, व्यापारी, बाजार समिती आणि लोडर्स यांना त्याचा लाभ होणार आहे.  हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT