YCMOU Latest marathi news esakal
नाशिक

YCMOU Exam : पुनर्परिक्षार्थींना अर्जासाठी ‘मुक्त’ची मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे मे-जून २०२३मध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भात सूचना पत्र जारी करण्यात आले आहे. त्‍यानुसार पुनर्परीक्षार्थींना परीक्षा अर्ज भरण्यासाठी विना विलंबशुल्‍क शुक्रवार (ता.७)पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (Extension for application to re examiners YCMOU Exam nashik new)

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

यापूर्वी ही मुदत ३१ मार्चपर्यंत होती. अधिकाधिक विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता यावा, या उद्देशाने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. दरम्यान, शंभर रुपये विलंब शुल्‍कासह अर्ज भरण्याची सुधारित मुदत ८ ते १२ एप्रिल अशी आणि पाचशे रुपये विशेष विलंब शुल्‍कासह अर्ज भरण्याची मुदत १३ ते १७ एप्रिलपर्यंत असेल.

परीक्षांचे सविस्‍तार वेळापत्रक एप्रिलअखेरीस जारी होण्याची शक्‍यता आहे. राज्‍यातील अधिकाधिक पुनर्परीक्षार्थींनी वाढीव मुदतीचा लाभ घेत परीक्षा अर्ज दाखल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT