Citylinc Disability Free Card esakal
नाशिक

Nashik News : दिव्यांगांच्या मोफत प्रवासी कार्डला या तारखेपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना सिटीलिंक बसमध्ये प्रवासासाठी देण्यात आलेल्या मोफत प्रवासी कार्डला मुदतवाढ दिली आहे. (Extension of free travel card of citylink bus for persons with disabilities nashik news)

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड कंपनीकडून मोफत दिव्यांग कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१ नोव्हेंबर २०२२ पासून दिव्यांग प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत सदर मोफत कार्डचा वापर दिव्यांग प्रवासी करू शकत होते. ३१ मार्चनंतर प्रवाशांना मोफत कार्डचे नूतनीकरण करणे आवश्यक होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र त्यानंतर सदर कार्डला दोनदा मुदतवाढ देण्यात येऊन सदर कार्डची मुदत ३० जूनपर्यंत करण्यात आली होती. मात्र दिव्यांग मोफत कार्डला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आल्याने दिव्यांग प्रवाशांना आता ३१ मार्च २०२४ पर्यंत मोफत कार्डचे नूतनीकरण करण्याची गरज नाही.

कारण दिव्यांग मोफत कार्डची मुदत ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यानुसार आता मोफत कार्डधारक दिव्यांग प्रवासी ३१ मार्च २०२४ पर्यंत सद्यःस्थितीत त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कार्डचा वापर प्रवासासाठी करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

Latest Marathi News Update : खालापूर जवळील इमॅजिका पार्कमध्ये 47 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Fatty Liver: भारतात झपाट्याने वाढतोय फॅटी लिव्हरचा धोका! अशी ओळखा लक्षणे...

What Action Will Tukaram Mundhe Take? बनावट दूध पावडरचे मोठे रॅकेट अन् अधिकाऱ्यांचे हात गुंतल्याचा संशय; सिन्नरमधील 'त्या' घोटाळ्याची मुंढेकडे लेखी तक्रार, काय कारवाई होणार?

SCROLL FOR NEXT