NDCC Bank
NDCC Bank esakal
नाशिक

NDCC Bank : जिल्हा बॅंक प्रशासकीय मंडळास 30 जूनपर्यंत मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

NDCC Bank : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळास ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय १६ फेब्रुवारी रोजी झालेला असताना त्यांचा शासन आदेश मात्र २३ मे २०२३ रोजी प्राप्त झाला आहे.

इतक्या उशिराने आदेश देण्यामागील नेमके गौडबंगाल काय आहे, याची चर्चा सहकार विभागात सुरू आहे. (Extension of NDCC Bank Administrative Board till June 30 nashik news)

नाशिक जिल्हा बॅंकेची निवडणूक घेण्याची सहकार विभागाने तयारी करत ऑगस्ट २०२१ मध्ये निवडणूक प्रक्रियेस सुरवात केली होती. मात्र, २७ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने नाशिकसह राज्यातील सात जिल्हा बॅंकांची आर्थिक परिस्थिती बघत तसेच प्रशासकीय मंडळामुळे पंचवार्षिक निवडणूक ३१ मार्च २०२२ पर्यत स्थगिती दिली होती.

ही मुदत संपुष्टात आल्यानंतर सहकार विभागाने कोणताही कार्यवाही केली. १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सहकार विभागाने पत्राव्दारे ३१ मार्च २०२२ ते ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सदर निर्णयानंतर सहकार विभागाने आदेश निर्गमित करणे आवश्यक होते. परंतु, सहकार विभागास आता जाग आली असून २३ मे रोजी सहकार विभागाने आदेश काढत नाशिक जिल्हा बॅंकेच्या प्रशासकीय मंडळास ३० जून २०२३ पर्यंत मुदत वाढ देत असल्याचे आदेश काढले आहेत.

इतक्या उशिराने आदेश काढण्यामागील सहकार विभागाची भूमिका नेमकी काय असावी, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT