engineer.jpeg
engineer.jpeg 
नाशिक

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या नोंदणीस मुदतवाढ

सकाळवृत्तसेवा

नाशिक : खासगी क्षेत्रातील ज्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना नोकरीत असल्याने किंवा इतर कोणत्याही कारणाने दहा वर्षे पूर्ण झाल्यामुळे कंत्राटदार म्हणून नोंदणी/नोंदणी नूतनीकरण करता आलेले नाही, अशा अभियंत्यांना नोंदणीसाठी आता ३१ मार्च २०२१ पर्यंत नोंदणी करता येणार आहे.

मार्च २०२१ अखेर मुदतवाढ

अभियंत्यांना २१ मार्च २०२० पर्यंत नोंदणी/नोंदणी नूतनीकरणासाठी विशेष मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र कोविडमुळे अनेक अभियंत्यांना त्याचा लाभ मिळाला नाही. हा प्रश्न प्रशासकीय गुंत्यात अडकला होता. महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशन संघटनेचे राज्य महासचिव संजय शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांना व्हॉट्सॲपवरून तक्रार मांडली. त्यांनी त्याची दखल घेत पुन्हा अशा नोंदणी/नूतनीकरण करण्यापासून वंचित राहिलेल्या अभियंत्यांना मार्च २०२१ अखेर मुदतवाढ दिली. अशा सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना याचा लाभ घेता येईल, असे आवाहन महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे महासचिव संजय शिंदे यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Hemant Karkare: अन् करकरेंच्या पत्नीने नाकारले मोदींचे एक कोटी रुपये, 16 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं?

Jalgaon Summer Heat : मतदान केंद्रावर मिळणार ‘ग्लुकोज-डी, ओआरएस, बीपी, शुगर’ची गोळी; मतदारांनो, बिनधास्त पडा घराबाहेर

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

SCROLL FOR NEXT