Money Fraud esakal
नाशिक

Nashik Crime: परदेशी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 7 लाखांना गंडा; स्वस्तात विमान प्रवासाचे तिकिटाचे दाखविले आमिष

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : रशियातील किरगिस्तान येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुटीनिमित्त भारतात परतायचे होते. त्यासाठी त्याठिकाणी शिकणाऱ्या संशयिताने स्वस्तात विमान तिकीट काढून देण्याचे आमिष दाखवून ११ विद्यार्थ्यांना तब्बल सहा लाख ८६ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत संशयित विद्यार्थ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. (Extort 7 lakhs from foreign students lure of cheap air tickets Nashik Crime)

प्रतीक दादाजी पगार (रा. मोरे मळा, हनुमानवाडी, पंचवटी) असे संशयित विद्यार्थ्याचे नाव आहे. दिनेश सुभाष खैरनार (रा. साई शक्ती रो हाऊस, आनंदनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलासह आणखी दहा मुले रशियातील किरगीस्तानात विविध शाखांत पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत.

या ठिकाणी संशयित प्रतीक पगार हाही शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. सुट्या असल्याने या ११ विद्यार्थ्यांना भारतात परतायचे होते. त्यासाठी ते विमान तिकीट बुकिंगची चौकशी करीत होते.

त्या वेळी संशयित प्रतीक हा नाशिकचाच असल्याने आणि या विद्यार्थ्यांच्या आधी तो किरगीस्तानात शिक्षण घेत असल्याने त्याने या विद्यार्थ्यांना ‘मी स्वस्तात विमान तिकीट काढून देतो’ असे आमिष दाखविले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विद्यार्थ्यांनी याबाबत पालकांशी संपर्क साधून सांगितले. त्यानुसार स्वस्तात विमान तिकीट मिळणार असल्याने संशयित पगार याने ११ विद्यार्थ्यांकडून सहा लाख ८६ हजार रुपये घेतले. परंतु, त्यानंतर त्याने या विद्यार्थ्यांना ना तिकीट दिले, ना पैसे परत केले.

याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता संशयिताने विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसात संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक उपनिरीक्षक राजपूत तपास करीत आहेत. संशयित प्रतीक हा नाशिकमध्ये आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT