st bus 
नाशिक

दिवाळीच्‍या हंगामात महामंडळातर्फे जादा बसगाड्या; प्रवाशांची गैरसोय टळणार

अरुण मलाणी

नाशिक : दिवाळीच्‍या सणानिमित्त वाहतूक करणाऱ्या प्रवाश्‍यांमध्ये होणारी वाढ लक्षात घेता महाराष्ट्र राज्‍य मार्ग परीवहन महामंडळातर्फे जादा बसगाड्या सोडण्याचे नियोजन आखले आहे. बुधवार (ता.११) पासून या जादा बसगाड्या सोडण्यास सुरवात झाली असून, येत्‍या २२ नोव्‍हेंबरपर्यंत जादा बसगाड्या प्रवाशांसाठी उपलब्‍ध होतील. 

सध्याच्‍या कोरोनाच्‍या पार्श्वभुमिवर मास्‍क, सॅनिटायझरसह अन्‍य नियमांचे पालन करुन प्रवाशांना एसटीने प्रवास करता येणार आहे. तसेच महामंडळातर्फे नियमितपणे बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण केले जात असल्‍याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली आहे.

सुरक्षित प्रवासाची संधी

नाशिकपासून जिल्‍ह्‍यातील तालुक्‍याच्‍या पातळीवरील मोठ्या गावांमध्ये तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, मुंबई, औरंगाबाद या मार्गांवर ६३ जादा बसगाड्या सोडल्‍या जाणार आहेत. यामूळे प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाश्‍यांची गैरसोय टळणार असून सुरक्षित प्रवासाची संधी उपलब्‍ध होणार आहे. नाशिक शहरातून जुने सीबीएस, नवीन सीबीएस व महामार्ग बसस्‍थानकाहून बसगाड्या सोडल्‍या जातील. यापैकी महामार्ग बसस्‍थानकाहून कासारा, मुंबई, नगर, सोलापूर व सातारा या ठिकाणांसाठी बसगाड्या सोडल्‍या जातील. नवीन सीबीएस येथून धुळे, जळगावसह पुणे व औरंगाबादकरीता जादा बसगाड्या उपलब्‍ध असतील. जादा बसगाड्या उपलब्‍ध झाल्‍याने गेल्‍या काही दिवसांपासून शुकशुकाट असलेली बसस्‍थानके प्रवाशांनी गजबजली आहेत. सध्याच्‍या परीस्‍थितीत आवश्‍यक ती खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले जाते आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT