The fake country liquor factory in Belgaon Kurhe was destroyed and the seized goods and two suspects. A team of State Excise Department including esakal
नाशिक

Nashik Crime: पोल्ट्री फार्ममधील बनावट देशीदारुचा कारखाना उदध्वस्त; बेलगाव कुऱ्हे येथे एक्साईजच्या पथकाचा छापा

बेलगाव कुऱ्हे (ता. इगतपुरी) येथे पोल्ट्री फार्मच्या आडून चालविला जाणारा बनावट देशीदारुचा कारखानाच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बेलगाव कुऱ्हे (ता. इगतपुरी) येथे पोल्ट्री फार्मच्या आडून चालविला जाणारा बनावट देशीदारुचा कारखानाच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या हाती लागला आहे. जमिनीत खोलवर दारुसाठी वापरण्यात येणार्या स्पीरिटच्या टाक्या आढळून आल्या.

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. एक्साईजच्या पथकाने सुमारे १४ लाखांचा साठा व साहित्य जप्त केले आहे. (Fake liquor factory busted in Poultry farm Excise team raid at Belgaon Kurhe Nashik Crime)

संजय भिमाजी गुळवे, बच्चू मंगा भगत अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांना बेलगाव कुऱ्हे या गावानजिक पोल्ट्री फार्मच्या आडून बनावट देशी दारु निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची खबर मिळाली होती.

त्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक गेल्या चार दिवसांपासून याठिकाणी पाळत ठेवून होती. बनावट दारूच्या कारखान्याची खात्री पटताच, मंगळवारी (ता. १६) मध्यरात्री एक्साईजच्या पथकाने मल्हार पोल्ट्री फार्मवर छापा टाकला.

त्यावेळी त्याठिकाणी बनावट देशीदारुची निर्मिती सुरू असल्याचे आढळून आले. याठिकाणी शुद्ध आरोचे पाणी, मद्य भरण्यासाठीचे बॉटलिंग मशिन, बनावट मद्याने भरलेले ८३ बॉक्स पथकाच्या हाती लागले.

तसेच, कारखान्यात जमिनीत खोलवर स्पीरिटचे ड्रम गाडलेले होते. बनावट मद्यासह साहित्य असा १४ लाख २७ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला.

सदरची कामगिरी एक्साईजचे उपायुक्त डॉ. बी.एच. तडवी, अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक निरीक्षक आर.सी. केरीपाळे, सुनील दिघोळे, कैलास कसबे, राहुल पवार, विजेंद्र चव्हाण यांनी केली आहे. तपास निरीक्षक आर.सी. केरिपाळे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT