Fake Medical Certificate case esakal
नाशिक

Fake Medical Certificate Case : 'ते' 16 पोलिस कर्मचारी ‘Not Reachable’

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पोलिस कर्मचाऱ्यांनी आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रप्रकरणात गुन्हा दाखल असलेले १६ पोलिस कर्मचारी अद्यापही नोट रिचेबल आहेत. तालुका पोलिस त्यांचा शोध घेण्यासाठी कर्तव्याच्या ठिकाणांसह मूळ गावी जाऊनही तेथेही हे पोलिस कर्मचारी मिळून न आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तसेच, जिल्हा न्यायालयाने अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात गेलेल्या जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकही तालुका पोलिसांच्या हाती लागू शकलेले नाहीत. (Fake Medical Certificate Case 16 Police Personnel Not Reachable nashi news)

आंतरजिल्हा बदल्यांसाठी २१ पोलिस कर्मचाऱ्यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल केले होते. सदरील प्रमाणपत्र बनावट असल्याप्रकरणी गेल्या महिन्यात नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यात २१ पोलिस कर्मचाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह खासगी डॉक्टरांचा समावेश आहे. तालुका पोलिस ठाण्याच्या तपासात २१ प्रमाणपत्रांपैकी पाच पोलिस कर्मचारी हे चौकशीसाठी तालुका पोलीसात हजर झाले.

तसेच त्यांच्या प्रमाणपत्रात दोष नसल्याचेही तपासात स्पष्ट झाले. मात्र, उर्वरित १६ पोलिस कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी नोटिसा बजावूनही ते हजर झालेले नाहीत. तसेच, त्यांना ताब्यात घेण्यासाठी तालुका पोलिस ठाण्याचे पथक जळगाव, पालघर व बृहन्मुंबई या कर्तव्याच्या ठिकाणीही पोहोचले, त्यांच्या मूळ गावीही पथक केले. मात्र ते मिळून आलेले नाहीत. त्यामुळे या पसार झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसंदर्भातील पुरावे तालुका पोलिसांनी संकलित केले आहेत. त्यामुळे १६ पोलिस कर्मचारी जेव्हाही हजर होतील तेव्हा त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याचप्रमाणे नाशिक जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. श्रीवास, कर्मचारी किशोर पगारे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक जिल्हा न्यायालयाने फेटाळले आहेत. त्यानंतर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असता, पगारे याचा अटकपूर्व अर्ज फेटाळला आहे तर डॉ. सैंदाणे यांच्या अर्जावर पुढील महिन्याच्या १४ तारखेला सुनावणी आहे. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून तिघेही पसार असून नॉटरिचेबल आहेत. तालुका पोलिसांच्या हाती पोलिसांसह सिव्हिलचे तिघे कर्मचारी लागत नसल्याचे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

"बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांबाबत १६ पोलिस कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके सातत्याने जात आहेत. तपास योग्यरितीने सुरू आहे."

- सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन न्यायाधीशांमध्ये काय बिनसलं? Supreme Court च्या टीकेनंतर हायकोर्ट न्यायमूर्तींची खटल्यातून माघार, CJI सूर्यकांतांकडे विनंती

Mahashivratri : महाशिवरात्रीमुळे उपवासाच्या पदार्थांना मागणी; शेंगदाण्याच्या भावात वाढ; साबुदाणा, भगर स्वस्त, आवक जास्त

पाकिस्तानात 'धुरंधर' सिनेमाची 'इतक्या' रुपयात होतेय पायरेटेड कॉपीची विक्री, सोशल मीडियावर Viral Video

ICU Bed Issue : ‘आयसीयू’ बेडसाठी धावाधाव; रुग्णसंख्येच्या तुलनेत बेडची संख्या अपुरी

Latest Marathi News Live Update : जगभरात आज 'व्हॅलेंटाईन डे' आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जाणार

SCROLL FOR NEXT