nashik sakal
नाशिक

बोगस क्रीडा प्रमाणपत्राचे पुन्‍हा नाशिक कनेक्‍शन

सेपक टकरातील खेळाडूला पुण्यात अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बोगस क्रीडा प्रमाणपत्राच्‍या साहाय्याने शासकीय नोकरीत दाखल होण्याचे काही प्रकरणे गेल्‍या काही महिन्‍यात उघडकीस आली आहेत. यात आणखी एका प्रकरणाची भर पडली असून, संशयित प्रभाकर गाडेकरला पुण्यातील हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. सेपक टकरा अजिंक्‍यपद स्‍पर्धेत तो नाशिककडून खेळल्‍याचे दाखविण्यात आल्‍याची बाब समोर आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करताना प्रमाणपत्र देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, संशयित प्रभाकर गाडेकर २०१८ मधील २९ व्या वरिष्ठ गट राज्‍य सेपक टकरा अजिंक्‍यपद स्‍पर्धेत नाशिक संघाकडून खेळल्याचे नोंदींमध्ये दाखविण्यात आले. याच खेळातील बोगस प्रमाणपत्राद्वारे संशयित प्रभाकर गाडेकर २०१९ मध्ये नगर येथील शासकीय नोकरीत दाखल झाला. खेळातील काही सक्रिय खेळाडूंनी या संशयास्पद प्रकाराबाबतची माहिती क्रीडा आयुक्‍त ओमप्रकाश बकोरीया यांना देताना तक्रार दाखल केली होती.

यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला. बोगस क्रीडा प्रमाणपत्राबाबत सेपक टकरा संघटनेच्‍या नाशिक येथील पदाधिकाऱ्यास काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. त्‍यातच नुकताच बोगस प्रमाणपत्राचे आणखी एक प्रकार उघडकीस आल्‍याने प्रमाणपत्र घोटाळ्याची व्‍याप्ती आणखी वाढण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. दरम्‍यान, संशयित प्रभाकर गाडेकरला पोलिसांनी न्‍यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. उत्तरीय तपासात आणखी काही मासे पोलिसांच्‍या गळाला लागण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT