Stock of fake pesticides seized by Bharari team of Agriculture Department at Talegaon  esakal
नाशिक

Nashik Crime News : कीटकनाशकांचा बनावट साठा पथकाकडून जप्त

सकाळ वृत्तसेवा

लखमापूर (जि. नाशिक) : कीटकनाशकांचा प्रभावाचा प्रश्‍न आणि बनवेगिरीबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत कृषि विभागाने टाकलेल्या छाप्यात तळेगाव येथे सुमारे सव्वा सहा लाखांचा बनावट कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. (Fake stock of pesticides seized by agriculture department team at Talegaon dindori nashik Latest Crime News)

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष व भाजीपाला ही पिके मुख्य असून हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांकडून किटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अधिकृत कीटकनाशके विक्रेते यांच्याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना अनाधिकृत व्यक्तीकडून कमी दरात बनावट कीटकनाशके उपलब्ध करून दिले जात असल्याचा संशय कृषी विभागास होता. त्यादृष्टीने सापळा रचून तळेगांव येथील मे. नंदिनी किचन अॅप्लीकेशन प्रा. लि. यांच्या आवारात संशयित कीटकनाशक साठा कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने जप्त केला आहे.

विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, तंत्र अधिकारी (गु.नि) संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील यांच्या सहकार्याने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजीत घुमरे यांनी ही कारवाई केली आहे.

भरारी पथकाने बनावट कीटकनाशकाचा सुमारे २९५ किलो/ लिटरचा साठा जप्त केला असून, त्याचे बाजारमूल्य सुमारे ६.१६ लाख एवढे आहे. कारवाईत दिंडोरीचे कृषी अधिकारी दीपक साबळे सहभागी झाले होते. संशयित दीपक मोहन अग्रवाल यांच्याविरुद्ध कीटकनाशक कायदा, नियम तसेच पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजित घुमरे यांनी दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav ने मला खूप मेसेज केले होते...' बॉलिवूड अभिनेत्रीचा धक्कादायक दावा; नेमकं काय म्हणाली?

VIRAL VIDEO : एअर इंडियाच्या बिझनेस क्लासमध्ये धक्कादायक घटना; मद्यधुंद प्रवाशाने सहप्रवाशांवर केली लघवी, लज्जास्पद व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : जागा वाटपाची चर्चा फिसकटल्याने पिंपरी चिंचवड शहरात भाजप शिवसेना युती तुटली : श्रीरंग बारणे

Air India Express Offers : नववर्षाची विमान प्रवाशांसाठी मोठी ऑफर! Air India Express ची Pay-Day Sale सुरू; तिकिटांवर बंपर सवलत

पुण्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजितदादांनी दिलं तिकीट, NCP नेत्याच्या दोन मुलांना वेगवेगळ्या पक्षांची उमेदवारी

SCROLL FOR NEXT