नाशिक

बनावट वाहतूक पोलिसाचा प्रताप, वाहनचालकांकडे पैशांची मागणी

CD
10297 पिंपळगाव बसवंत : वाहनचालकांकडे पैशांची मागणी करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक करताना पोलीस निरीक्षक गणेश गुरव. तोतया वाहतूक पोलिसाकडून पैशांची मागणी चिंचखेड चौफुलीवरील प्रकार उघड; गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. ३ : वाहतूक पोलिस असल्याचे भासवून वाहनचालकांकडून पैशांची मागणी करणाऱ्या तोतया पोलिसाला ताब्यात घेण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. अंगावर महाराष्ट्र पोलिस असा बॅज, वाहतूक पोलिसांचा लोगो असलेला गणवेश आणि हातात पांढऱ्या रंगाचे मशीन घेऊन वाहनचालकांना अडविणाऱ्या आकाश बाळासाहेब क्षीरसागर (रा. ओझर) याच्याविरुद्ध पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (ता.२ नोव्हेंबर) दुपारी साडेतीनला चिंचखेड चौफुली येथील सर्व्हिस रोडवर हा प्रकार घडला. संशयिताने खाकी रंगाची पँट, काळा बेल्ट, महाराष्ट्र पोलीस बॅज आणि वाहतूक पोलिसांचा लोगो असलेला गणवेश परिधान केला होता. हातात पांढऱ्या रंगाचे मशीन घेऊन आपण वाहतूक पोलिस असल्याचे भासवत तो वाहनचालकांकडे पैशांची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, संशयित यापूर्वी नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करीत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पिंपळगाव बसवंत येथे कोणतीही अधिकृत नियुक्ती किंवा शासकीय अधिकार नसताना त्याने वाहतूक पोलिस असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara District Bank: जयकुमार गोरेंचा करिष्मा! ७५ पैकी ५३ मते घेत सातारा जिल्हा बँकेत दणदणीत विजय; अर्जुन काळेंचा दमदार प्रवेश, शेखर गोरेंना केवळ ७ मते

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा! दिवाळीत पाणीकपात रद्द, MIDCचा निर्णय

Dharashiv News: भूम शहरातील नागरिकांसाठी गुड न्यूज! अनेक भागांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण होणार; विकासकामांचे भूमिपूजन

Raigad Fort: शिवप्रेमी पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! रायगडाची सफर आता चार मिनिटांत, दीड महिन्यानंतर रोपवे पुन्हा सुरू

Satara Bank Election: ४४-४४ मतांचा पेच अन् ईश्वर चिठ्ठीचा कौल; सातारा जिल्हा बँकेत सुनील माने विजयी, कोरेगावात राष्ट्रवादीची मते फुटली?

SCROLL FOR NEXT