Bal Thackeray sakal
नाशिक

'विद्यार्थी मुलींच्या प्रेमात पडतात अन् तू माझ्या प्रेमात पडला'

बाळासाहेब ठाकरे यांच्या २२ हजार वृत्तपत्रातील कात्रणांचा अनोखा संग्रह

आनंद बोरा,सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दत्ता कॉलेजचे विद्यार्थी मुलींच्या प्रेमात पडतात अन् तू माझ्या प्रेमात पडला, हे शब्द खुद्द बाळासाहेब ठाकरे यांचे. त्यांना बघून जणू जमिनीवर प्रत्यक्षात देवाला भेटावे, अशी परिस्थिती झाली होती बाळासाहेब ठाकरे यांच्या २२ हजार वृत्तपत्रातील कात्रांचा अनोखा संग्रह करणाऱ्या नाशिकच्या दत्तात्रय कोठावदे यांची. दत्ताला आजही तो प्रसंग आठवला, की ते भूतकाळात रमून जातात.

१९९७-९८ चा काळ असेल. दत्ता रुंगठा शाळेत आठवीत शिकत होते. भालेकर मैदानावर बाळासाहेबांची सभा होणार होती. सहज उत्सुकता म्हणून सभेत जाऊन बाळासाहेबांचे विचार ऐकल्यानंतर उसळलेल्या चैतन्याची शिदोरी घेऊन घरी आलेला दत्ता शाळेत बाळासाहेबांच्या भाषणाची नक्कल करू लागतो. अन् मग काय बाळासाहेबांची प्रत्येक बातमी त्याच्या संग्रही होऊ लागते. २० वर्षांच्या मेहनतीनंतर तब्बल २२ हजार वृत्तपत्रातील कात्रणे जमा करून बाळासाहेबांचा इतिहासच जिवंत ठेवण्याचा हा छोटा प्रयत्न या संग्रहाकाने केला आहे. शाळेत असताना, दत्ता नेहमी बाळासाहेबांना पत्र लिहीत त्या पत्राचे उत्तर त्यावेळी सुभास देसाई देत असे. १९९६ मध्ये देसाई यांचे पत्र आले व बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावल्याचे कळविले अन् दत्ताच्या छातीतील ठोके मोठमोठ्याने वाजू लागले. आता देव प्रत्यक्षात भेटणार होता. बाळासाहेबांना माझा संग्रह बघायचा होता. संग्रहच दत्ताला बाळासाहेबांपर्यंत घेऊन गेला होता. बाळासाहेब स्वतः संग्रह बघणार, म्हणून पटापट संग्रहाच्या बॅगा भरून मातोश्रीवर जाऊन पोचला. बाळासाहेबांनी तो संग्रह तब्बल तीन दिवस बघितला. त्यांच्या सहवासात राहण्याची संधी दत्ताला मिळाली.

त्यांच्या कात्राणाच्या खजिन्यात रंग माझा वेगळा या लेखात कॅसिओ वाजविना बाळासाहेबांचा दुर्मिळ फोटो आपणास भेटतो. दादा कोंडके यांच्या निधनानंतर ‘हसने आता संपले’ या बातमीतील दादांच्या पार्थिवाजवळ बसलेले बाळासाहेब हा फोटो हृदयाला स्पर्श करून जातो. मीनाताई गेल्यावर ‘बाळासाहेबांची सावली व शिवसैनिकांची मावली’ ही बातमी मन हेलावाणारी होती. हा संग्रह बघण्यास दोन दिवस कमी पडतील, इतका मोठा इतिहास त्यांनी जमा केला आहे. मिशीतले बाळासाहेब हा अतिदुर्मिळ फोटो दत्ताकडे आहे. शशिकलाबरोबर गप्पा मारताना बाळासाहेब मिशीमध्ये दिसतात. बाळासाहेब-लतादीदी, बाळासाहेब-आशादीदी यांचे फोटो येथे दिसतात. एका कात्रणात चक्क माधुरी दीक्षित बाळासाहेबांची मुलाखत घेताना दिसते. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक लेख येथे भेटतात. बाळासाहेबांची राजकीय व्यांगचित्रे दत्ताने जमविली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: एअर शोमध्ये मोठा अपघात! भारताचे तेजस लढाऊ विमान कोसळले; थरारक व्हिडिओ व्हायरल

Masti 4 X Review: अडल्ट कॉमेडीचा ओव्हरडोस! कसा आहे आफताब- रितेश- विवेकचा 'मस्ती ४'? एक्सवर नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Live Update : कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाला मोठा धक्का

BIBI-ka-Maqbara: जागोजागी पडझड, सौंदर्य काळवंडले! हेच आहे का वारसा संवर्धन? बीबी-का-मकबरा विचारतोय प्रश्न

Viral Video: बिबट्या ड्रेस घालून नेहा कक्करने अंगावर ओतलं पाणी, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये केलं अस काही की, नेटकरी म्हणाले...'मोगली सेना'

SCROLL FOR NEXT