corona virus.jpg
corona virus.jpg 
नाशिक

राष्ट्रवादीच्या 'या' आमदार अन् कुटुंबातील तिघे कोरोनाबाधित...इथेही मुंबई कनेक्शन

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नाशिक रोड) देवळाली कॅम्पच्या राष्ट्रवादीच्या आमदार यांच्यासह कुटुंबातील तिघांना लागण झाल्याचे गुरुवारी (ता. 28) स्पष्ट झाले. या चौघांसह जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पन्नास रुग्ण वाढले असून, यात मालेगावमधील 32, नाशिक शहरातील 13 आणि जानोरी (ता. दिंडोरी) व ओझर येथील रुग्णांचा समावेश आहे. 

रघुपती अपार्टमेंटचा परिसर प्रतिबंधित

शहरात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 152 झाली असून, आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 46 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आजमितीस 98 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी 210 नवीन संशयित रुग्ण जिल्ह्यातील कोविड रुग्णालयामध्ये दाखल झाले असून, यात नाशिक शहरातील 98 रुग्ण आहेत. मुंबईत 12 दिवस राहून देवळाली मतदारसंघात परतलेल्या आमदार सरोज आहिरे यांनी खबरदारी म्हणून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने स्वतःला दहा दिवसांसाठी क्वारंटाइन करून घेतले होते; परंतु गेल्या शुक्रवारी त्यांना त्रास होऊ लागल्याने स्वॅब घेतला असता, आमदारांसह त्यांच्या घरातील चौघे कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रशासनाने त्या राहत असलेला रघुपती अपार्टमेंटचा परिसर प्रतिबंधित केला. 

शहरात 13 रुग्ण वाढले

विसे मळा येथील मृत पोलिस कर्मचाऱ्याच्या संपर्कातील एकाच कुटुंबातील पाच जण असून, त्यात 26 वर्षीय तरुण, 53 वर्षीय पुरुष, 23 व 25 वर्षीय तरुणीसह 45 वर्षीय महिलेचा समावेश आहे. पखाल रोडच्या मृत वृद्धाच्या संपर्कातील दोनवर्षीय बालिका, दूध बाजार परिसरातील 30 वर्षीय व्यक्ती, नाईकवाडीपुरा येथील रुग्णाच्या संपर्कातील 54 वर्षीय पुरुष, जत्रा हॉटेल परिसरातील रुग्णाच्या संपर्कातील 33 वर्षीय व्यक्ती, दत्तमंदिर (नाशिक रोड) परिसरातील रुग्णाच्या संपर्कातील 39 वर्षीय महिला व 15 वर्षीय युवक, मुमताजनगर, वडाळा येथील रुग्णाच्या संपर्कातील दहावर्षीय मुलगी कोरोनाबाधित आहे, तसेच रथचक्र सोसायटी (इंदिरानगर) परिसरातील 32 वर्षीय व्यक्तीला थंडी-ताप-सर्दी-पडशाचा त्रास होत असल्याने तो अशोका हॉस्पिटल येथे दाखल झाला असता त्याचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

मालेगाव, दिंडोरीत पुन्हा बाधित रुग्ण 

गुरुवारी दिवसभरात मालेगावमध्ये आणखी 32 नवीन बाधित रुग्णांची भर पडली आहे. आठवडाभरापूर्वी दिंडोरी तालुका कोरोनामुक्त झाला असतानाही जानोरी येथेही आणखी एक 53 वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, तसेच ओझर येथेही एका रुग्णाची भर पडली आहे. याशिवाय मुंबईतील कळवा आणि चोपडा (जि. जळगाव) हे दोघेही नाशिकमध्ये उपचारासाठी आले असता, यादरम्यान त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजार 108 झाली आहे. 

मला व माझ्या कुटुंबातील तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या सर्वांचे आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी आहेतच. बोलताना त्रास होत असल्याने प्रत्यक्ष फोनवर बोलणे शक्‍य नाही. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. मी लवकरच आपल्या सेवेत हजर होईन. सर्वांनी घरीच राहून सुरक्षिततेची काळजी घ्यावी. - सरोज आहिरे, आमदार, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT