नाशिक

शालकाच्या हत्येनंतर मेहुण्यासह सहा संशयीतांना अटक

CD
खून प्रकरणी मेहुण्यासह सहा संशयिताना अटक पाच दिवसाची पोलिस कोठडी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : बहिणीला नांदविण्यावरून झालेल्या कौटुंबिक वादातून सनी डोळे याची धारदार शस्त्राने भोसकून मेहुण्याने खून केला. या प्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल होऊन संशयित मेहुणा सूरज वानखेडे, त्याच्या कुटुंबातील सहा संशयिताना पोलिसांनी अटक केली. त्यांना मंगळवारी (ता. २७) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व संशयिताना पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली. छत्रपती शिवाजीनगरातील जे. के. जिनिंगजवळील रहिवासी विद्या विनोद डोळे यांच्या घरात मुलगी चांदणी हिच्या नांदवण्यावरून उभय पक्षाची बैठक बोलावली होती. चर्चा सुरू असताना, चांदणीचा पती सूरज वानखेडे याने वाद घालून सनी विनोद डोळे (वय २२) याच्यावर शस्त्राने सपासप वार केल्याने तो जागेवरच कोसळला. त्यास रुग्णालयात दाखल केल्यावर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात विद्या डोळे यांच्या तक्रारीवरून सूरज वानखेडे, रोशन वानखेडे, निकेश वानखेडे, नारायण वानखेडे, मंगला वानखेडे आणि प्रमिला मधुकर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. संशयिताना अटक झाली. सर्व संशयिताना जिल्‍हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सर्व संशयिताना ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहायक निरीक्षक सुरेश आव्हाड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile attack: सौदी अरेबियाच्या संरक्षण मंत्रालयावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला; येमेनमधील हूती बंडखोरांचा दावा

Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

‘राजीव गांधी पंतप्रधान व्हावेत, असं मला कधीच वाटलं नाही’; सोनिया गांधी यांचा मोठा खुलासा

Pune Crime : पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस; मॉडेलिंग क्षेत्रातील दोन तरुणींची सुटका

CSK COACHING STAFF : IPL २०२७ आधी CSK मध्ये मोठे बदल! अल्बी मॉर्केल, गॅरेथ बॅटींची एन्ट्री; मोहित शर्माकडे गोलंदाजीची जबाबदारी

SCROLL FOR NEXT