Family Planning Surgery esakal
नाशिक

Family Planning Surgery : नसबंदीकडे पुरूषांची पाठ! वर्षभरात अवघ्या 5 पुरूषांनी केल्या शस्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : कुटुंब लहान, सुख महान...या ओळीतून दिला जाणारा मर्यादित कुटंबाचा संदेश बहुतांश दाम्पत्याला रूचलेला आहे. त्यामुळे आता मुलाचा फार हट्ट न धरता एक किंवा दोन अपत्यांवर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेतली जाते.

कुटुंबनियोजनासाठी महिला किंवा पुरूष यापैकी कोणीही एक शस्त्रक्रिया करू शकतो. पण या शस्त्रक्रियेत निफाड तालुक्यात महिलाचाच सहभाग अधिक दिसतो आहे. निफाड तालुक्यात वर्षभरात एक हजार ६७९ पैकी फक्त पाच तर एक हजार ६७४ महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या आहे.

स्त्रियांच्या तुलनेत सोप्या असलेल्या कुटंब नियोजन शस्त्रक्रियेकडे पुरूषांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. (Family Planning Surgery Men no to sterilization Only 5 men underwent surgery in year nashik news)

निफाड तालुक्यात तीन हजार २४१ एवढे शस्त्रक्रियेचे यंदा उद्दिष्ट देण्यात आले आहे. पण गत दहा महिन्यात म्हणजे एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत एक हजार ६७९ शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.

त्यामध्ये पुरूषाचा वाटा (०.४ टक्के) खारीचा सुध्दा नसून महिलांचे ९९ टक्के प्रमाणात पाहता लोकसंख्या नियंत्रणासाठी त्यांनी सिंहाचा वाटा उचललेला दिसतो. शस्त्रक्रिया उद्दिष्टपूर्तीसाठी आरोग्य विभागाकडे तीन महिने शिल्लक आहेत.

सुरगाणा, पेठ या आदिवासी भागात कुटुंबनियोजनात तेथील पुरूष महिलांच्या बरोबरीने शस्त्रक्रियेसाठी पुढे येतात. पण सधन व शिक्षित निफाड तालुक्यात याउलट चित्र आहे. येथे महिलांवरच ही जबाबदारी सोपविली जाते. दहा महिन्यात अवघ्या पाच पुरूषांनी शस्त्रक्रियेची जबाबदारी स्वतःवर घेत आदर्श उभा केला.

पुरूष नसबंदी विषयीचा गैरसमज त्यांनी खोडून काढला. पुरूषांमध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रिबाबत जनजागृती करणे आवश्‍यक बनले आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी महिला व पुरूष या दोघांची सारखीच जबाबदारी असते. मात्र, अजूनही गैरसमजामुळे पुरूष अजूनही शस्त्रक्रियेसाठी पुढे येत नसल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

निफाड तालुक्यात कुटुंब नियोजनशस्त्रक्रियेचे उद्दिष्ट ५२ टक्के झाले असून ते पूर्ण करण्यासाठी आरोग्य कर्मचारी पात्र लाभार्थीचा शोध घेऊन त्यांना शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करीत आहेत. कर्मचाऱ्यांकडून जनजागृती करण्यात येत आहे. पुरूषप्रधान संस्कृतीमुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा भार महिलाच्याच खांद्यावर दिला जात आहे.

पुरूषांवरील शस्त्रक्रिया सोपी...

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत महिलांच्या तुलनेत पुरूषांचे प्रमाण खुपच अत्यल्प आहे. यामागे अनेक कारण आहेत. यात महिलांपेक्षा पुरूषांवरील शस्त्रक्रिया सोपी आहे. त्यामुळे पुरूष शस्त्रक्रियेबाबत असलेले गैरसमज दूर होणे महत्त्वाचे आहे.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया उद्दिष्ट : तीन हजार २४१

झालेल्या शस्त्रक्रिया : एक हजार ६७९

टक्के : ५२

"कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया महिलांनीच करावी, ही मानसिकता आता बदलायला हवी. गरोदरपण, प्रसूती, मुलांचे संगोपन ही सर्व जबाबदारी महिला निभावत असेल तर शस्त्रक्रियेसाठी पुरूषांनी पुढे येण्यास हरकत नाही. महिलांच्या तुलनेत पुरूष शस्त्रक्रिया अधिक सोपी ठरते." - डॉ. योगेश धनवटे, वैद्यकीय अधिकारी, पिंपळगाव बसवंत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT