covid ward.jpg
covid ward.jpg 
नाशिक

कोरोना नसूनही ठेवले कोरोनाबाधितांमध्ये?...अन् नंतर म्हणे चुकून झाले...कुटुंबाची थरारक आपबिती

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना हा शब्द कानावर पडला तरीही धडकी भरते...मित्रमंडळी, नातेवाईकच नव्हे, तर कुटुंबीयसुद्धा दोन हात लांब राहतात. परंतु एकापेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांबरोबर तास, दोन तास नव्हे, तर तब्बल पाच दिवस राहण्याची वेळ आली ती सातपूरच्या मोठा राजवाडा भागातील काळे कुटुंबीयांवर...विशेष म्हणजे, कोरोना पॉझिटिव्ह असेल तर उपचार का नाही, अशी विचारणा केल्यानंतर, "माफ करा चुकून तुमचे नाव आले' असे म्हणत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. 

असा आहे प्रकार

काळे कुटुंबातील एका सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 4 जुलैला त्यांना तातडीने महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच-सहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना मेरी येथील डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहात हलविण्यात आले. त्याच ठिकाणी काळे कुटुंबातील अन्य सात सदस्यांनादेखील 4 जुलैपासून क्वारंटाइन करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कुटुंबातील सहा सदस्यांना निगेटिव्ह अहवाल आल्याने घरी सोडून देण्यात आले. तर, दोघांना अहवाल प्रलंबित असल्याचे कारण देत वसतिगृहातच ठेवण्यात आले. एक- दोन नव्हे, तर तब्बल पाच दिवस उलटूनही अहवाल येत नसल्याने व जेवण, नाश्‍ता, औषधांसाठीही कोणी विचारणा करत नसल्याने हे कुटुंबीय वैतागले अन्‌ त्यांनी थेट कार्यालय गाठून जाब विचारला. मात्र, त्यावेळी मिळालेले अजब उत्तर ऐकूण सर्वांचीच गाळण उडाली. तुम्हाला कोरोना नाही, चुकून तुम्हाला थांबविण्यात आल्याचे सांगत हा प्रकार अंगलट येऊ नये, या भीतीने तातडीने डिस्चार्ज देण्यात आला. 

कोविड सेंटरमधील अनागोंदी 

काळे कुटुंबातील दोन सदस्यांना अहवाल प्रलंबित असल्याचे कारण देऊन ज्या वसतिगृहात थांबविण्यात आले तेथे कोरोनाबाधित रुग्णदेखील आहेत. त्यामुळे पाच दिवस कोरोनाबाधितांसोबत राहावे लागल्याने काळे कुटुंबीयांची भीतीने गाळण उडाली. कोरोनाची लक्षणे नसल्याचे सांगत डिस्चार्ज दिला असला, तरी मनातील भीती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. कोविड सेंटरमधील अनागोंदी कारभारावर वचक असायला हवा अन्यथा इतरांच्या चुकांमुळे अनेकांचे जीव जातील, अशी भावना व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT