farmer committed suicide in talwade digar nashik marathi news
farmer committed suicide in talwade digar nashik marathi news 
नाशिक

डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि सततची नापिकी; शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

रोशन भामरे

तळवाडे दिगर (जि. नाशिक) : मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने कुटुंबाचा उदनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले.

शेतकऱ्यांसाठी यंदाचे वर्ष हे परीक्षा घेणारेच ठरले आहे, एकामागून एक नैसर्गीक संकटांनी शेतकऱ्याचे जगणे अवघड केले आहे. पिकावर पडणारे रोग, पाऊस, थंडी या सगळ्यांमधून उत्पादन खर्च कमालीचा वाढल्याने शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत आहे.. त्यातून हातात आलेल्या पिकाला भाव मिळत नसल्याने बळीराजा कात्रीत सापडला आहे.. तळवाडे दिगर येथे शेतकऱ्याने शुक्रवारी (ता.२२ ) आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

शेतकऱ्यावर आस्मानी- सुलतानी संकटं

सुनील बाळू पगार (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे, त्यांची तळवाडे दिगर येथे पाच एकर शेती आहे. त्यांच्या घरची परिस्थिती हालाकिची असल्याने त्यांनी शेतीवर एच डी एफ सी बँकेचे व्याजासह २१ लाख, तर डांगसौंदाणे येथील सप्तश्रृंगी महिला बँकेकडून ५ लाखाचे कर्ज घेतले होते. तसेच शेतीच्या भांडवलासाठी हातउसनवार केली होती. मात्र मागील दोन वर्षांपासून भाजीपाला पिकावर खराब वातावरणाचा मारा आणि पिक पिकून आले तर अत्यल्प बाजाभाव आशा अस्मानी-सुलतानी संकटांना तोंड देत शेतीचा गाडा ओढत होते.

मुलाने पाहिला घडलेला प्रकार

घेतलेले कर्ज व हातउसनवार कसे फेडणार कुंटुबाचा उदनिर्वाह कसा चालवणार याच विवंचनेत ते कायम असायचे. दरम्यान सकाळी त्यांच्या शेतातील टरबूज फवारणीसाठी  शेतात गेले असता  शेतातील आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच दरम्यान फवारणीसाठी वडिलांना मदतीसाठी गेलेल्या त्यांच्या मुलाने सर्व प्रकार पहिल्या नंतर स्थानिक ग्रामस्थांनी आत्महत्याबाबत माहिती दिली. सटाणा पोलिस ठाण्यास पोलिस नाईक पंकज सोनवणे यांनी पंचनामा केला. सटाणा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक. पंकज सोनवणे व जयंतसिंग सोळखे करीत आहेत.तर सुनील पगार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आई वडील असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT