farmer destroyed the grape yard esakal
नाशिक

शेतकऱ्याने द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड | Nashik

अरूण खंगाळ,लासलगाव

लासलगाव (जि. नाशिक) : गेल्या तीन वर्षांपासून सततच्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. निफाड तालुक्यातील ब्राह्मणगाव विंचूर येथील शेतकरी रावसाहेब गवळी यांनी आपल्या एक एकर शेतीमध्ये द्राक्ष लागवड केली होती, मात्र गेल्या २४ तासात झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाल्याने वैतागून त्यांनी संपूर्ण द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवली.

लाखोंच्या उत्पन्नावर पाणी

गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हतबल झाले आहे. मोठ्या प्रमाणामध्ये द्राक्षबागा वाचवण्यासाठी खर्च करून देखील या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याने निराशेतून ब्राह्मणगाव नजीक येथील शेतकऱ्याने आपल्या एक एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवली आहे. या द्राक्षाच्या हंगामामध्ये दीड लाखाहून अधिक असा खर्च करून देखील संपूर्ण बागेचे या अवकाळीने नुकसान केल्याने अपेक्षित असलेले चार ते पाच लाखांचे उत्पन्नावर पाणी फेरावे लागले आहे.

दर कमी त्यात पावसाने केले नुकसान

या अवकाळी पावसात बाग वाचविण्यासाठी औषध फवारणी दररोज करूनही हाती काही येईल याची खात्री उरलेली नाही. यामुळे त्रस्त झालेल्या निफाड तालुक्यातील ब्राम्हणगाव (विंचूर) येथील रावसाहेब वसंत गवळी या शेतकऱ्याने एक एकर सोनाका द्राक्षबागेवर कुऱ्हाडीचे घाव घालून बाग तोडून टाकले. या अवकाळी पावसाने लासलगाव परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चांगलेच धास्तवले. दोन वर्षे कोरोनामुळे सर्व बाजारपेठा बंद राहिल्या. शेतीमालाला योग्य दर मिळत नव्हता. त्यात आता अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे आणि पिकांचे नुकसान होत असून फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागा धोक्यात सापडल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT