A farmer plowing a field with a pair of bullocks  esakal
नाशिक

Nashik News : खरीप हंगामासाठी बळिराजा सज्ज

सकाळ वृत्तसेवा

येसगाव (जि. नाशिक) : खरीप हंगामात उत्पादन घेऊन आपली आर्थिक घडी जोडण्यासाठी बळिराजा पुन्हा तयारी लागला असून खरीप हंगामासाठी त्याची लगीनघाई सुरू झाली आहे. बैलजोडी आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतीकामास सुरवात केली आहे. (farmer is ready for Kharif season nashik news)

सर्वत्र उन्हाळी कामांची लगबग सुरू झाली आहे. बऱ्याच भागात उन्हाळी भगवा कांदा काढून झाला आहे. नवीन पीक घेण्यासाठी शेतात नांगरणी सुरू झाली आहे. शेतातील खते टाकणे, हार्वेस्टरच्या साह्याने काढलेल्या गव्हाच्या काड्या जाळणे, उन्हाळ कांदा साठवून करणे, आदी कामात शेतकरी व्यस्त असून खरीप हंगामासाठी सज्ज होत आहे.

निसर्गात बदल झाल्यामुळे सातत्याने येणारे ढगाळ वातावरण, बेमोसमी पाऊस यामुळे शेती कामाचेही नियोजन बिघडत आहे. गुढीपाडव्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरवात करणाऱ्या बळीराजाला आर्थिक संकटामुळे पुढील हंगामाच्या नियोजनाची चिंता लागलेली आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकरी शेतात नांगरणीला सुरवात करतो.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

आर्थिक नियोजन करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीतले काम केली जात आहेत. कल्टीवेटर, रोटावेटर, पल्टी नांगर तसेच आदी नवनवीन यंत्रामुळे कामे लवकरात लवकर होत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे ते त्यांच्या माध्यामातून शेतात नांगरणी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT