३६-२
केवायसीच्या बहाण्याने
शेतकऱ्याला घाला गंडा
सहा लाख परस्पर काढून घेतले
सकाळ वृत्तसेवा
वणी, ता. ४ : बँक खात्याचे केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांनी जऊळके- वणी येथील एका शेतकऱ्याला सहा लाख १३ हजार २२२ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. बँकेचा प्रतिनिधी असल्याचे भासवून शेतकऱ्याला व्हॉट्सॲपवर बनावट एपीके फाईल पाठविण्यात आली. तिच्या माध्यमातून शेतकरी व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर हस्तांतरित करून आर्थिक फसवणूक करण्यात आली. नाशिक ग्रामीण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला.
फिर्यादीनुसार, संबंधित शेतकऱ्याला अज्ञाताने आपण युको बँकेचे प्रतिनिधी असल्याचे सांगत विश्वास संपादन केला. बँक खात्याचे ऑनलाइन केवायसी अपडेट करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी व्हॉट्सॲपद्वारे ''UCO_KYC_UPDATE.apk'' या नावाची APK फाईल पाठविली. फिर्यादीने संबंधित लिंकच्या माध्यमातून प्रक्रिया केली. मात्र, या फाईलच्या माध्यमातून भामट्यांनी फिर्यादीच्या मोबाईलमधील माहितीचा गैरवापर केला. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय एकूण सहा लाख १३ हजार २२२ रुपये २ पैसे इतकी रक्कम परस्पर हस्तांतरित करण्यात आली. दरम्यान बँकेच्या केवायसी अपडेटच्या नावाखाली पाठविण्यात येणाऱ्या बनावट एपीके फाईल किंवा लिंक डाउनलोड करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.