हेंकळवाडी येथील शेतकऱ्याची
दीड लाखांची ऑनलाईन फसवणूक
सोनगीर, ता. १० : हेंकळवाडी (ता. धुळे) येथील एका शेतकऱ्याचा मोबाईल हॅक करत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्यातील एक लाख ४५ हजार ३४८ रुपये काढून घेतले. याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भगवान सुदाम पाटील (वय ४५) यांच्या कॅनेरा बँकेतील खात्यावर पीक कर्जाची रक्कम व इतर जमा असे एक लाख ४५ हजार ३४८ रुपये शिल्लक होते. १४ सप्टेंबरला रात्री नऊच्या सुमारास शेतकरी पाटील यांच्या मोबाईलवर एक संशयास्पद मॅसेज आला. त्यांनी तो उघडताच मोबाईलचा डिस्प्ले अचानक बंद पडला आणि काही वेळात मोबाईल पूर्ववत सुरू झाला. त्यानंतर १६ सप्टेंबरला दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा असाच मेसेज आल्यावर मोबाईलचा डिस्प्ले काही काळासाठी बंद पडला. १७ सप्टेंबरला त्यांनी मोबाईलमध्ये फोन पे द्वारे बॅलन्स तपासला असता, त्यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम शून्य दाखवत होती. त्यांनी तातडीने कॅनेरा बँकेत धाव घेतली आणि चौकशी केली असता, १४ सप्टेंबरला बँक ऑफ महाराष्ट्र (खाते क्र. ६०५९२००८३५९) मधील ९६ हजार ५४८ रुपये आणि १६ सप्टेंबरला फिनो पेमेंट बँक (खाते क्र. ३०००२३८८९६०) मधील ४८ हजार ८०० रुपये असे एकूण एक लाख ४५ हजार ३४८ रुपये ऑनलाईन ट्रान्सफर झाल्याचे दिसून आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांचा भाऊ समाधान पाटील यांच्या मदतीने तत्काळ सायबर क्राईमच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवली. यानंतर त्यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात अज्ञात बँक खातेदारांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. पोलिस याप्रकरणी तपास करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.