जिल्ह्यातील ११ खरेदी केंद्रांवर
शेतकऱ्यांना नावनोंदणीची सुविधा
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ६ : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगामात ज्वारी, मका व बाजरी या भरडधान्यांची शासकीय खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना नोंदणीची संधी मिळणार आहे. यासाठी शासनाने नोंदणीची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविली असून, जिल्ह्यातील ११ खरेदी केंद्रांवर नोंदणी करता येईल.
नोंदणीसाठी यापूर्वी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. तथापि, शेतकऱ्यांना नोंदणीसाठी अधिक कालावधी उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करताना सातबारा उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स आदी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत. सातबारा उताऱ्यावर संबंधित पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे घेऊन शेतकऱ्यांनी तालुक्यातील संबंधित खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नोंदणीसाठी येवला तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, मालेगाव शेतकरी सहकारी खरेदी-विक्री संघ, देवळा तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, विंचूर कृषिसाधना म. फळे व भाजी सहकारी संस्था, सिन्नर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, चांदवड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, सटाणा विविध कार्यकारी सहकारी संस्था, नामपूर विविध कार्यकारी सहकारी संस्था, ज्ञानेश्वर नांदगाव तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ, अंदरसूल सहकारमहर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे विविध कार्यकारी सेवा संस्था, लासलगाव विभाग सहकारी खरेदी-विक्री संघ येथे नाव नोंदवता येणार आहे.
शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुदतीत नोंदणी करावी, असे आवाहन राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित, मुंबई यांच्या जिल्हा पणन अधिकारी कार्यालयाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.