नाशिक

पिकावर रोटाव्हेटर फिरवणाऱ्या शेतकऱ्यांचा बांधावर पोहचले प्रांतधिकारी

CD
32560 कवठळ : येथील शेतकरी विनोद चौधरी यांच्या शेतावर पिकांची पाहणी करताना प्रांताधिकारी दीपक गिरासे, सोबत शेतकरी, कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी. पिकांवर रोटाव्हेटर फिरवणाऱ्या शेतकऱ्याच्या बांधावर प्रांताधिकारी सकाळ वृत्तसेवा वडाळी, ता. १५ : पाण्याअभावी २६ एकर क्षेत्रातील उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवावा लागलेल्या शेतकऱ्याची व्यथा जाणून घेण्यासाठी प्रांताधिकारी दीपक गिरासे गुरुवारी (ता. १५) थेट शेताच्या बांधावर पोहोचले. या वेळी त्यांनी पाण्याअभावी उद्भवलेल्या गंभीर समस्येची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्याला दिलासा दिला. कवठळ येथील शेतकरी विनोद चौधरी यांची ६० एकर शेती आहे. त्यांपैकी २६ एकरात त्यांनी केळी, पपई आणि ऊस, तर उर्वरित ३४ एकरांत कापूस व मिरचीची लागवड केली होती. या सर्व पिकांच्या लागवडीसाठी त्यांनी सुमारे २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. मात्र, ऐन गर्दीच्या वेळी शेतातील कूपनलिकेची पाण्याची पातळी अचानक खालावली.हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून ३ लाख रुपये खर्च करून त्यांनी ६०० फुटांपर्यंत नवीन बोअरवेल खोदली. मात्र, पाणी लागले नाही. त्यामुळे पिकांना कसे वाचवावे, या चिंतेत असलेल्या विनोद चौधरी यांनी अखेर अश्रू ढाळत उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवला. विनोद चौधरी यांनी उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरवल्याची धक्कादायक माहिती मिळताच प्रांताधिकारी दीपक गिरासे हे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेताच्या बांधावर पोहोचले. प्रांताधिकाऱ्यांनी शासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

Manoj Jarange On Farmer Relief : "५ हजारांसाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या रांगेत मरायचं का?"; मनोज जरांगेंचा सरकारवर थेट हल्लाबोल, म्हणाले...

Latest Marathi News Update: कोथरुडमध्ये मद्यधुंद तरुणाची बेदरकारपणे ड्रायव्हिंग

SCROLL FOR NEXT