नाशिक

पारेगावच्या शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

CD
पान-१ ---------- अशोक खिल्लारे YEO26B27402 ------------------ ३६-२ नापिकी, कर्जास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या पारेगाव ः विहिरीत उडी घेत संपविले जीवन सकाळ वृत्तसेवा येवला, ता.३ : सततची नापिकी, त्यातून वाढलेले कर्ज, कुटुंबापुढील आर्थिक विवंचनेतून ऐन दिवाळीच्या सणातच पारेगाव येथील शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अशोक लक्षण खिल्लारे ( ५९) असे शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. दिवाळीचा सण साजरा करण्याची चिंता, कर्जाची परतफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते. खरिपाचे उत्पन्न न आल्याने ते याबाबत कुटुंबाकडे सतत चिंता व्यक्त करत होते. सोमवारी रात्री (ता.२) दहाच्या सुमारास त्यांनी राहत्या घराशेजारील विहिरीत उडी घेतली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. हात उसने व इतर कर्जामुळे ते सतत तणावात असायचे अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. दोन वर्षांपासून सततची नापिकी, शेतीच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने खिल्लारे यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. त्यातच कर्जाचा वाढता बोजा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. घटनेची माहिती समजताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. ही माहिती महसूल प्रशासनासह पोलिसांना देण्यात आल्यानंतर चौकशी सुरू आहे. खिल्लारे यांच्यावर मंगळवारी (ता.३) सकाळी शोकाकुल वातावरणात पारेगाव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐन दिवाळीच्या सणासुदीत एका शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने पारेगावसह संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. १६-१ गरज आहे आधाराची सततची नापिकी, वाढता उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारा अपुरा बाजारभाव आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर योग्य बाजारभाव, पीकविमा आणि कर्जविषयक दिलासा मिळण्याची गरज आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना वेळीच मानसिक आधार मिळणेही महत्त्वाचे ठरत आहे. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: '२४ तास झाले, आता तरी चर्चेला या!' राहुल गांधींचे मोदींना पुन्हा आव्हान; एपस्टीन प्रकरणही उकरून काढले

Tukaram Mundhe: ''तुम्हाला चांगलं अन्न नकोय का?'' असं का म्हणाले तुकाराम मुंढे? मंत्र्यांना मुंढे का नकोसे वाटतात? दिलं उत्तर...

Operation Lotus: जम्मू-काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन कमळ’? राजकीय चर्चांना उधाण; काय म्हणाले राम माधव?

MPSC Exam Inquiry: एमपीएससीच्या नऊ परीक्षांची चौकशी; राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ यादीतून वगळल्याने विद्यार्थ्यांचा सवाल

Israel-Iran War: नेतन्याहू यांचा मोठा प्लॅन लीक! इराणला उद्ध्वस्त करण्याचा डाव? चार लष्करी अधिकाऱ्यांच्या खिशात...

SCROLL FOR NEXT