नाशिक

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची आस

CD
पहिला हप्ता जमा; दुसऱ्या मदतीची प्रतीक्षा ६५८ कोटींच्या अनुदानाची मागणी, घोषणेअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.१७ : दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत दिली. पात्र ४ लाख ४७ हजार ४३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण २२३ कोटी ५२ लाख १५ हजार रुपये जमा झाले. मात्र, नुकसानभरपाईच्या उर्वरित मदतीबाबत सरकारकडून अद्याप घोषणा झालेली नसल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम हातचा गेला असून रब्बी हंगामही संकटात सापडला आहे. धरणांमधील उपलब्ध पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याने सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. अशा परिस्थितीत टँकरच्या पाण्यावर रब्बीची पिके घेण्याचे नियोजन शेतकरी करीत आहेत. त्यासाठी शासनाकडून उर्वरित नुकसानभरपाईची मदत लवकर मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, दुसऱ्या हप्त्याबाबत कोणतीही ठोस घोषणा नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ६५८ कोटींच्या मदतीची मागणी यंदा पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला. जिल्ह्यातील ३ हजार ३०६ गावांमधील ६ लाख ४४ हजार २८९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, ५ लाख ५७ हजार ७०१ शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे ६५८ कोटी ६० लाख ३६ हजार रुपयांच्या मदत अनुदानाची मागणी केली आहे. मात्र, अग्रिम मदतीनंतर उर्वरित अनुदान कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''उत्तर प्रदेशमध्ये आम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री पाहिजे'', मौलाना साजिद रशिदी यांचा विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला

Pimpri Dairy Farm Flyover : डेअरी फार्म उड्डाणपुलाचा फायदा की नवा धोका? राँग साइड वाहनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मंगळचा केतूच्या नक्षत्रात प्रवेश; पुढील ३२ दिवस 'या' ३ राशींना बसू शकतो फटका!

Kaygaon News : ऊस दराचा तिढा सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक; जुने कायगाव येथील शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

Pune sugarcane rate : ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी पुढाकार घेणार का? सर्व कारखानदार, शेतकरी आणि संघटनेच्या प्रतिनिधींच्या बैठकीची मागणी

SCROLL FOR NEXT