नाशिक

अग्रीम मदतीपासून शेतकरी वंचित

CD
पान-४ मेन---- फोटो घेणे ---------------- अग्रीम मदतीपासून ३३ हजार शेतकरी वंचित ------------ निफाड तालुका ः फार्मर आयडीअभावी अनेकांच्या खात्यात वर्ग होण्यास अडचणी, पूर्तता करण्याची सूचना ------------ सकाळ वृत्तसेवा निफाड,ता.१४ ः तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले मात्र, तालुक्यातील सुमारे ३३ हजार शेतकरी अद्यापही पाच हजार रूपये अग्रीम मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. आधारकार्ड संलग्न नसणे, केवायसी नसणे, फार्मर आयडी नसणे याचबरोबर बॅंक खात्यावरील नाव व आधारवरील नावात फरक असणे यासह असंख्य कारणामुळे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होऊ शकलेली नाही. ------------- निफाड तालुक्यातील दुष्काळी पंचनाम्यांनुसार तब्बल ८८ हजार ३७३ शेतकऱ्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले. यात ६२ हजार १७४ हेक्टर क्षेत्राचा समावेश होता. संबंधित शेतकऱ्यांना मदतीसाठी ८३ कोटी ४ लाख ३३ हजार रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाने केवळ ५५ हजार २४६ शेतकऱ्यांनाच मदत मंजूर केली आहे. त्यामुळे प्रस्तावित लाभार्थी आणि प्रत्यक्ष मदत मिळालेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत मोठी तफावत दिसून येत आहे. दिवाळी उलटून गेल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा झालेली नाही. काही शेतकऱ्यांच्या खात्यात दोन /चार दिवसांपूर्वी पाच हजार रुपये जमा झाले, अद्यापही अनेक शेतकरी वंचित आहेत. महसूल प्रशासनाकडून लाभार्थ्यांच्या याद्या तयार करून त्या ऑनलाइन अपलोड करण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. लाभार्थी निवडीची प्रक्रिया, याद्यांमधील त्रुटी आणि निधी वितरणातील विलंब याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. --------- फेरतपासणी करण्याची मागणी शासनाकडे प्रस्ताव पाठविलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांना अग्रीम मदतीचा लाभ मिळणे अपेक्षित असताना हजारो शेतकरी अद्याप वंचित आहेत. त्यामुळे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लाभार्थी याद्यांची फेरतपासणी करावी, ऑनलाइन प्रक्रियेतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात आणि मदतीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम मदत त्वरित जमा करावी, अशी मागणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरगुडे यांनी केली आहे. ------------ कोट शासनाने दुष्काळग्रस्त भागांसाठी प्रति शेतकरी पाच हजार रुपये अग्रीम मदत म्हणून जाहीर करून ती शेतकऱ्यांच्या विविध बँकांच्या बँक खात्यात जमा केली आहे मात्र शेतकऱ्यांचे फार्मर आयडी, बँक खात्याशी आधार लिंक, सामायिक क्षेत्र, अशा अनेक बाबींची अडचण दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी त्रुटींची पूर्तता करून द्यावी. प्रत्येक गावानुसार महसूल अधिकारींकडे आम्ही याद्या देत असून त्याची पडताळणी केली जाणार आहे. - विशाल नाईकवाडे, तहसीलदार, निफाड. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: 'पुढची क्लिप डेंजर!' जरांगेंचा नवा ऑडिओ बॉम्ब येणार? फडणवीस-शिंदेंना काय दिला इशारा?

'सहा महिने कोणी विचारलं नाही, की यूपी-बिहारच्या लोकांना बोलतात'; 'त्या' पोस्टवरून प्रशांत किशोरांची राज ठाकरेंवर टीका, काय म्हणाले?

IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?

IND vs PAK Asia Cup Final: पाकिस्तानच्या जबड्यातून विजय खेचला; आपला भारत आशियाचा राजा झाला

CNG Price Hike: मुंबईत १५ दिवसांत दुसऱ्यांदा सीएनजीची दरवाढ; नवा दर किती? रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार?

SCROLL FOR NEXT