23605 MW power supply from MSEDCL aurangabad  sakal
नाशिक

महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप; सुरळीत वीजपुरवठा करण्याची मागणी

दिपक खैरनार

अंबासन (जि. नाशिक) : करंजाड (ता. बागलाण) येथील शिवारात रात्रभर महावितरण (MSEDCL) कंपनीकडून वीजपुरवठा (Power Supply) खंडीत केला जात आहे. शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांकडून महावितरणविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. महावितरणकडून रात्रीतून सिंगल फेज सुरू करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (Farmers anger against MSEDCL Demand for smooth power supply in Ambasan Nashik News)

करंजाड शेत शिवारात वस्ती करून असलेल्या शेतकऱ्यांचा रात्रीतून वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकऱ्यांकडून महावितरण कंपनीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात पिकांना वीजपुरवठ्याची आवश्‍यकता येत नाही. असे असतानाही महावितरणकडून रात्रीचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. करंजाड येथील संबधित अधिकाऱ्यांस शेतकऱ्यांनी याबाबत जाब विचारला असता वरिष्ठांकडून आदेश असल्याचे सांगून उडवाउडवीची उत्तर दिली जातात असल्याचे शेतकरी शरद देवरे यांनी सांगितले.

करंजाड शिवारात अनेक शेतकरी वस्ती करून राहतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून हेतूपुरस्सर रात्रीतून वीजपुरवठा खंडित केला जात आहे. सध्या पावसाचे दिवस असतानाच शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे. याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वीजपुरवठ्याबाबत कुठलीही माहिती मिळू शकली नाही.

महावितरणने रात्रीतून वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी शरद देवरे, घनश्याम आहिरे, मधुकर शेवाळे, नानाभाऊ शेवाळे, योगेश देवरे, जगन आहिरे, विनोद आहिरे, दिलीप शेवाळे, अनिल शेवाळे, तानाजी आहिरे, साहेबराव आहिरे, महेंद्र आहिरे, नानाभाऊ पिंगळे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: स्वामी दर्शनासाठी निघालं कुटुंब, पण वाटेतच कोसळला दुःखाचा डोंगर; ५ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, ५ जण जखमी!

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT