Farmers angry Onion auction closed due to low price Lasalgaon Bazaar Committee esakal
नाशिक

Onion : विंचूरमध्ये शेतकरी संतप्त; कमी दरामुळे कांदा लिलाव पाडले बंद

लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात संचालक आणि पोलिस प्रशासनाची मध्यस्थी

सकाळ वृत्तसेवा

विंचूर (जि. नाशिक) : लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात कांद्याला लिलावामध्ये गुरुवारी (ता. १५) रोजी सकाळी पहिल्या सत्रात कमी दर पुकारल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडून सुमारे तासभर आंदोलन केले.

विंचूर उपबाजारात सकाळी शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. कांद्याचे लिलाव सुरू झाले. मात्र, कांद्याला लिलावात अवघे २०० ते ५०० रुपये इतका कमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी तत्काळ लिलाव बंद पाडले.

त्यानंतर बाजार समिती कार्यालयाला घेराव घातला. बुधवारी (ता. १४) तुलनेत गुरुवारी (ता. १५) ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत प्रशासनाला वेठीस धरले.

या वेळी संचालक संदीप दरेकर, छबू जाधव, राजेंद्र बोरगुडे, सहायक सचिव प्रकाश कुमावत यांच्यासह लासलगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक राहुल वाघ यांनी मध्यस्थी करत कांद्याचे लिलाव पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांजवळ केली.

लिलाव झालेल्या वाहनांचे फेर लिलावात कांद्याचे बाजार भाव न सुधारल्यास आपले आंदोलन सुरू ठेवा. मात्र फेर लिलाव एकदा होऊन द्या, या तोडग्यानंतर फेर लिलावामध्ये १०० रुपयांनी वाढून बाजारभाव मिळाला. मात्र संचालक मंडळ गेल्यानंतर कांद्याच्या बाजारभावाची परिस्थिती नंतर ‘जैसे थे’ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तेलंगणात दर अधिक मग महाराष्ट्रात का नाही?

शेतकऱ्यांची बाजारभावातून उत्पादन खर्च तर सोडा वाहतूक व मजुरी ही निघत नसल्याची खंत आहे. कांद्याला तेलंगणातील हैदराबाद बाजार समितीत सतराशे ते दोन हजार भाव मिळणार असल्याने हे दर महाराष्ट्र राज्यात पण जाहीर झाले पाहिजे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली.

कांद्याला तीन हजार रुपये हमीभाव द्या. अतिवृष्टीमुळे कांदा नुकसानीची त्वरित भरपाई खात्यात जमा करा. अल्प दराने विक्री केलेल्या कांद्यास अनुदान द्या, अशा मागण्या आता शेतकरी करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT