धुळे : टुडे पान २ साठी...
--
फोटो क्रमांक : 34365
धुळे : शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाखाची मदत द्यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांच्याकडे देत चर्चा करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी.
--
शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाखाची मदत द्या
--
धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ३ : चालू वर्षी पावसाळ्यात पर्जन्यमान अल्प राहिल्याने जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर भीषण दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यांना शासनाकडून तातडीने मदतीचा हात देण्याच्या आणि विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये भरपाई देण्याची केलेली मागणी सरकारकडून दुर्लक्षित करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला.
-
शासनाने घोषित केलेले पाच हजार रुपयांचे पीककर्ज अग्रीम आणि चाऱ्यासाठीचे मोजके अनुदान अपुरे असून, यामुळे बळीराजाची थट्टा होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. निवेदनात प्रामुख्याने शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई, सर्वसमावेशक सरसकट कर्जमाफी, विद्यार्थ्यांचे १०० टक्के शैक्षणिक शुल्क माफी, सुरळीत वीज पुरवठा, नदीकाठचे वीज कनेक्शन न तोडणे, जनावरांच्या चाऱ्यासाठी थेट बँक खात्यावर अनुदान, आणि रब्बी हंगामासाठी बियाणे-खतांचा खर्च अनुदान स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क पुन्हा लागू करावे, जेणेकरून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकेल, असा मुद्दाही मांडण्यात आला आहे. जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, विठ्ठलसिंग गिरासे, आधार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री पाटील, धुळे शहराध्यक्ष नंदू यलमामे, नितीन गावडे, जगन ताकटे, सरोज कदम, वाल्मीक मराठे, कुणाल पाटील, गिरीश नेरकर, वसंत राऊत, मनीराम अहिरे, चंद्रकांत पाटील, व्यंकटेश पाटील, विनोद बच्छाव, डॉ. शांताराम पाटील, देविदास मोरे, जगदीश बोरसे, दिलीप पवार, डी. टी. पाटील, यशवंत पाटील, प्रदीप नांद्रे, रवी तोरवणे, हसन पहेलवान, शांतीलाल पाटील, अमित खैरनार, स्मिता खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.