नाशिक

शेतकऱ्यांना स्वतःच्या ब्रँडने विकता येणार शेतमाल

CD
(जाहीरातदार बातमी) --- शेतकऱ्यांना स्वतःच्या ब्रँडने विकता येणार शेतमाल ब्रँडच्या माध्यमातून बाजारपेठेशी जोडण्यासाठी ग्रीन ग्रोथ ॲग्रोचा पुढाकार सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १७ : शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल स्वत:च्या ब्रँडने विकता यावा, शेतीमालाला योग्य भाव मिळावा, मालाची गुणवत्ता सुधारावी आणि त्यांना थेट बाजारपेठेशी जोडता यावे, या उद्देशाने येथील ग्रीन ग्रोथ ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शेतकऱ्यांनी शेतमालाची स्वच्छता, प्रतवारी, ग्रेडिंग, पॅकिंग आणि ॲगमार्क करून स्वतःचा व्यवसाय उभा करावा, हा यामागील उद्देश आहे. सध्या शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी बाजार समित्यांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, बाजारभावातील चढ-उतार, योग्य खरेदीदार मिळण्याची अनिश्चितता आणि अपेक्षित भाव न मिळणे, अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. या अडचणी लक्षात घेऊन ग्रीन ग्रोथ ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीने नंदुरबारात अत्याधुनिक प्री क्लिंग व सॉर्टेक्स मशिनची सुविधा उपलब्ध केली आहे. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना गहू, हरभरा, मका, ज्वारी, सोयाबीन यांसह विविध प्रकारच्या धान्याची स्वच्छता, निवड, वर्गीकरण आणि प्रतवारी करता येणार आहे. या सर्व सुविधांमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाची गुणवत्ता सुधारून बाजारपेठेत विक्रीसाठी अधिक चांगल्या पद्धतीने तयार करता येईल. स्वतःच्या ब्रँडने विक्रीची संधी ग्रीन ग्रोथ ॲग्रोत शेतकऱ्यांना स्वच्छ व प्रतवारी केलेला शेतीमाल २५ आणि ५० किलोच्या आकर्षक पॅकिंगमध्ये स्वतःच्या बँड नावाने पॅक करून घेता येणार आहे. कमी खर्चात शेतकरी आपल्या मालाला ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विटंल भाव वाढवून घेऊ शकतात. ब्रँडच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविण्याच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. साठवणूक आणि कर्जासाठी मार्गदर्शन शेतमालाची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस सुविधांबाबतही शेतकऱ्यांना कंपनीमार्फत मार्गदर्शन केले जाते. वेअरहाऊसमध्ये साठवलेल्या शेतमालाच्या तारणावर कर्ज मिळविण्याच्या प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील परिस्थितीनुसार आपल्या शेतमालाच्या विक्रीचा निर्णय घेणे अधिक सोयीचे होऊ शकते.

Supreme Court : "तुम्ही खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही"; वकिलाचे CJI सूर्यकांत यांना भर कोर्टात खडे बोल, आता होणार फौजदारी कारवाई?

एमएस धोनी IPL मधून निवृत्त! CSK कडून मोठी घोषणा, आता दिसणार या भूमिकेत

Accident News: तिघांना उडवून कार खड्ड्यात कोसळली ;एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी ; खापरी शिवारातील घटना

Maharashtra: वारसा संवर्धनासोबत स्वच्छताही महत्त्वाची! संरक्षित स्मारकांजवळ शौचालयांना मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरात वाढणार ‘अक्वान’ चक्रीवादळाची तीव्रता वाढणार; २० नोव्हेंबरला आंध्र प्रदेश किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT