farmer.jpg 
नाशिक

...अखेर 'त्यांच्या' प्रयत्नातून उजळणार गावच्या विकासवाटा!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (चांदवड) दरवर्षी शेतकऱ्यांना पावसाळ्यात गावातून शेतीत जाणे किंवा शेतमाल नेण्यासाठी कसरत करावी लागत होती. रस्ता खूपच खराब असल्याने वर्षानुवर्षे हाल होत असतांना अखेर शेतकऱ्यांनीच पुढाकार घेऊन घेतला 'हा' निर्णय...त्यामुळे होणारी कसरत थांबणार असल्याचे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

वर्षानुवर्षे होणारे हाल थांबणार

लॉकडाउनमध्ये लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी रस्ता बनविला. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे होणारे हाल थांबणार आहेत. निमोणच्या पूर्वेला शेतशिवारात दाट लोकवस्ती आहे. यात देवरे, गांगुर्डे, अहिरे, दखणे आदी शंभरावर शेतकरी आहेत. मात्र, दर वर्षी शेतकऱ्यांना पावसाळ्यात गावातून शेतीत जाणे किंवा शेतमाल नेण्यासाठी कसरत करावी लागत होती. निमोणपासून कुंदलगाव शिवापर्यंत दीड-दोन किलोमीटरच्या रस्त्यावर शेतकरी वर्षानुवर्षे त्रास सहन करीत होते. बोडके वस्तीपासून पुंजाराम देवरे यांच्या घरापर्यंत हा रस्ता खूपच खराब होता. हा रस्ता करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. मात्र, पदरी निराशा पडत असल्याने सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चाने रस्ता बनविण्याचे ठरविले. एकत्र येत दीड किलोमीटरचा रस्ता तयार केला. जेसीबी, ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने खडी, मुरूम वाहून रस्ता बनविला. यासाठी काही शेतकऱ्यांनी शेतातील विहिरीचा भराव दिला. रवींद्र दखणे यांनी शेतात पाणी साठविण्यासाठी मोठा खड्डा तयार करून त्यातील मुरूम रस्त्यासाठी दिला. 

रस्त्यासाठी चार ते पाच दिवस शेतकऱ्यांनी स्वतः विनामोबदला काम केले. त्यात विलास देवरे, साहेबराव देवरे, राजाराम देवरे, वाल्मीक देवरे, संजय देवरे, दत्तू देवरे, यादव देवरे, भास्कर देवरे, उत्तम देवरे, तुकाराम देवरे, शशी गवारे, उत्तम गवारे, धर्मा गांगुर्डे, भारत अहिरे, किरण गांगुर्डे, गटलू देवरे, रतन देवरे, रवींद्र दखणे, मधुकर दखणे, सुनील दखणे, भास्कर दखणे, रमेश दखणे व इतर शेतकऱ्यांनी योगदान दिले. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल थांबणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT