WRS26B02825
साक्री : येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देताना घोडदे परिसरातील शेतकरी.
--------
कृषीपंपांना दिवसा वीज द्यावी
घोडदे परिसरातील शेतकऱ्यांची मागणी; रास्ता रोकोचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
वार्सा, ता. ३ : घोडदे (ता. साक्री) परिसरातील कृषीपंपांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी घोडदे, सुरपान, आमोडे, किरवाडे व ढोलीपाडा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत साक्री येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
घोडदे येथील शेतकरी ज्ञानेश्वर (नानाभाऊ) सुरेश क्षीरसागर (वय ४३) हे २४ सप्टेंबरला रात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. या वेळी त्यांना विषारी सर्पाने दंश केला. उपचारादरम्यान २६ सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. सध्या कृषीपंपांसाठी रात्रीच्या वेळी वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना अंधारात शेतात जाऊन पिकांना पाणी द्यावे लागते. रात्रीच्या वेळी साप, विंचू तसेच अन्य वन्यप्राण्यांचा धोका असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
घोडदे, सुरपान, आमोडे, किरवाडे व ढोलीपाडा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत कृषीपंपांसाठी वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास संबंधित कार्यालयासमोर आंदोलन, तसेच रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.
या वेळी ग्रामपंचायत सदस्य अमोल क्षीरसागर, ज्येष्ठ नागरिक डी. एल. पाटील, संभाजी पाटील, हंसराज पाटील, कांतीलाल पवार, संजय गांगुर्डे, दिनेश क्षीरसागर, सुरेश पाटील (किरवाडे), शशिकांत क्षीरसागर, अमित सोनवणे, योगेंद्र सोनवणे, राजेंद्र जिरे, अनिल निकम, कल्पेश क्षीरसागर, संजय क्षीरसागर, अशोक चव्हाण, दीपक निकम (सुरपान) आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.