नाशिक

लाटीपाडा धरणाच्या उजव्या कॅनलद्वारे काटवान परिसराला तीन आवर्तने द्या!!

CD
फोटो..02772 साक्री ः उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांना लाटीपाडा धरणाच्या उजव्या कॅनलद्वारे आवर्तन सोडावे, याबाबत निवेदन देताना प्रा. युवराज काकुस्ते आणि शेतकरी बांधव. काटवान परिसराला तीन आवर्तने द्यावीत शेतकऱ्यांची उपजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी साक्री, ता. १८ : लाटीपाडा धरणातून उजव्या कॅनलद्वारे काटवान परिसरातील शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देत तीन आवर्तने सोडावीत, अशी मागणी काटवान परिसरातील शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील यांच्याकडे केली. काटवान परिसरात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाअभावी जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असून, रब्बीतील पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यासाठी लाटीपाडा धरणाच्या उजव्या कॅनलद्वारे पाणी सोडणे आवश्यक असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करून काटवान परिसरातील शेतकऱ्यांना किमान तीन आवर्तने मिळावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच शेतीला पाणी उपलब्ध झाल्याने चारा पिकविण्याचा प्रश्नही मार्गी लागू शकतो. त्यामुळे जलसंपदा विभागाने तातडीने पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. काटवान परिसरातील शेतकरी प्राध्यापक युवराज काकुस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. निंबा जाधव, प्रभाकर कुवर, मोतीराम कुवर, भास्कर कुवर, एन. डी. जाधव, विजय कुवर, नवल जाधव, श्रीराम कुवर, सुखदेव कुवर, विनोद कुवर, विलास जाधव, देवीदास कुवर आदी उपस्थित होते. .......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Payment: ग्राहकांसाठी महत्त्वाचे! देशात उद्या 45 मिनिटं बंद राहणार यूपीआय सेवा; पैशांची देवाण-घेवाण होणार नाही

रुपाली चव्हाण यांची राष्ट्रीय योगा रेफ्री पदावर नियुक्ती

Junnar Farmers : शेतीचा वाढता उत्पादन खर्च रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा निर्णय; बनकर फाट्यात कांदा लागवड ७००, पुरुष मजुरी ८०० आणि इतर कामांसाठी ५०० रुपये दर

Instagram वर ब्लू टिकसाठी आता पैसे देण्याची गरज नाही! जाणून घ्या अकाउंट मोफत व्हेरिफाय करण्याची सोपी ट्रिक...

Satara Bank Election: जिल्हा परिषदेचा बदला घेतला, शिवसेना-राष्ट्रवादीनं भाजपचा वचपा काढला

SCROLL FOR NEXT