Farmer Sakal
नाशिक

रेशीम उत्पादनातून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न; मिळवला राज्यभर लौकिक

रेशीम उद्योगाच्या माध्यमातून तालुक्यातील जाधववाडी येथील नाना ऊर्फ सखाहरी जाधव या शेतकऱ्याने यशस्वी होऊन दाखवले.

विजय पगार

इगतपुरी (जि. नाशिक) : रेशीम उद्योगाच्या (silk farming) माध्यमातून तालुक्यातील जाधववाडी येथील नाना ऊर्फ सखाहरी जाधव या शेतकऱ्याने यशस्वी होऊन दाखवले. त्यांनी शासनाचे सहकार्य आणि दिवसातील सकाळी आणि संध्याकाळी फक्त २ तास काम करून एक एकरातील तुती लागवड केली. या रेशीम शेतीतून त्यांनी ६ लाख ५० हजारापेक्षा जास्त उत्पन्न घेतले आहे. (Farmer earned more than 6 lakh 50 thousand from the silk farming)

निव्वळ नफा ६ लाख ५० हजार

जिल्ह्यात रेशीम उद्योगातील तज्ज्ञ शेतकरी म्हणून नाना जाधव प्रसिद्ध असून ते महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शनही करू लागले आहेत. स्थानिक कारखान्यात नोकरी, गावचे सरपंचपद, दूग्ध व्यवसाय, पारंपरिक शेती आदींमधून आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी नाना जाधव यांनी अविरत प्रयत्न केले. तथापि त्यांना यामध्ये यश मिळू शकले नाही. यामुळे उद्विग्नता वाढून वाईट विचार मनात येऊ लागले. अशा निर्णायक काळात त्यांना तुती लागवड आणि रेशीम उद्योगाबाबत माहिती मिळाली. जिल्हा रेशीम कार्यालयातून विविधांगी माहिती घेऊन त्यांनी रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. शासनाचे तांत्रिक साहाय्य घेऊन त्यांनी एक एकर क्षेत्रात रेशीम शेती उभी केली. योजनेतून सलग तीन वर्ष शासनाकडून योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे. दुसऱ्याच वर्षी त्यांची रेशीम कर्नाटक आणि नाशिकच्या बाजारपेठेत पोहोचवली. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण रेशीम असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. यावर्षी त्यांनी निव्वळ नफा ६ लाख ५० हजारापेक्षा जास्त कमावला. भांडवली खर्चाचा विचार केल्यास फक्त १० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च झालेला नाही. त्यांच्या सोबतीला भाचा धनंजय राव, पत्नी तुळसाबाई, आई जनाबाई मदत करतात. जिल्हा रेशीम अधिकारी सी. के. बडगुजर, सारंग सोरते, जोशी, तहसीलदार परमेश्वर कासुळे, तालुका कृषी अधिकारी शीतलकुमार तंवर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.

विविध संस्थांकडून पुरस्कार

रेशीम उद्योगाचा व्यवसाय यशस्वी झाल्यामुळे आता आयुष्यभर एवढी चांगली असणारी रेशीम शेती सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण कुटुंब या उद्योगात समरस आणि समाधानी झाल्याचा आनंद कुठेही मिळणार नसल्याचे ते सांगतात. जिल्हाभरातील विविध भागातील शेतकऱ्यांना नाना जाधव आणि रेशीम हे समीकरण माहीत झाले आहे. त्यामुळे नाना जाधव यांच्याकडून शेतकऱ्यांना रेशीम शेतीबाबत नेहमी प्रभावी मार्गदर्शन केले जाते. यामुळे विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरविलेले आहे.

(Farmer earned more than 6 lakh 50 thousand from the silk farming)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : मोबाईलवरील ट्रॅफिक E Challan इग्नोर केल्यास थेट दोन प्रकारची कायदेशीर कारवाई; १९ लाख चलन थकित, ४१० कोटींच्या वसुलीची मोहीम

Meghalaya Assembly : आमदार पत्नी मुख्यमंत्र्यांना विकासाच्या मुद्द्यावर सभागृहातच नडली, विधानसभेत पाहायला मिळाले अचंबित करणारे दृश्य

पाय घसरला आणि.., पडता पडता थोडक्यात वाचली जेनिलिया, सोशल मीडियावर Viral Video

VIDEO : अवघ्या २४ तासांत भयंकर चक्रीवादळ! हिंदी महासागरात होरासियो Category 5 वादळ, होणार गंभीर परिणाम, डोळे फिरवणारा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Traffic Fine: गाडी पुण्यात, चालान नागपुरात; वाहतूक पोलिस विभागाचा अजब कारभार

SCROLL FOR NEXT