नाशिक

फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक! शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन,कंपन्यांच्या बैठकीतून सूचना देण्याची ग्वाही

CD
पान चार मेन ----------- 27347 येवला : फायनान्स कंपन्यांची सक्तीची वसुली थांबवावी या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी. फायनान्स कंपन्यांकडून सक्तीने वसुली; राष्ट्रवादी आक्रमक देवरगावच्या शेतकऱ्यास मारहाण केल्याचा आरोप; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन, सकाळ वृत्तसेवा येवला,ता. २८ : एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना दुसरीकडे फायनान्स व मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी कथित सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी होत आहे. तालुक्यातील देवरगावच्या शेतकऱ्याला कर्जवसुलीसाठी येवल्यात बोलावून मारहाण केल्याचा आरोप करण्यात करून या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेत प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांना निवेदन दिले. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जदारांना दिलासा द्यावा आणि सक्तीच्या वसुलीला आळा घालण्यासाठी संबंधित वित्तीय संस्थांना स्पष्ट सूचना द्याव्यात, अशी मागणी पक्षाने केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष शाहूराजे शिंदे, विधानसभा कार्यकारी अध्यक्ष अजीज शेख, शहराध्यक्ष योगेश सोनवणे, युवक तालुकाध्यक्ष किरण ठाकरे, सागर पडवळ, अन्सार शेख, वाल्मीक सोपे आदी उपस्थित होते. तालुक्यात यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली असून, दैनंदिन खर्चासह शेतीचा खर्च भागविताना त्यांची दमछाक होत आहे.अशा परिस्थितीत कर्जाच्या हप्त्यांसाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारींमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. फायनान्स कंपन्या, मायक्रो फायनान्स कंपन्या, पतसंस्था आणि अन्य वित्तीय संस्थांनी वसुली करताना शेतकऱ्यांपुढील अडचणीची जाणीव ठेवावी अशी मागणी केली आहे. या मागणीची दखल घेत प्रांताधिकारी गाढवे यांनी लवकरच साहाय्यक निबंधक आणि संबंधित फायनान्स कंपन्या व वित्तीय संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेत वसुलीबाबत आवश्यक सूचना दिल्या जातील असे आश्वासन दिले. --------- मारहाणीचा आरोप देवरगाव येथील शेतकरी सुनील डांगे यांना एका फायनान्स कंपनीने वसुलीसाठी जबरदस्तीने येवल्यात बोलावले. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित वसुली होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. या घटनेचा निषेध करत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी गाढवे यांची भेट घेतली. संबंधित प्रकरणाची दखल घेऊन सक्तीच्या वसुलीच्या प्रकारांना प्रतिबंध घालावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री तसेच महसूलमंत्र्यांनीही वित्तीय संस्थांनी कर्जवसुली करताना अतिउत्साहीपणा दाखवू नये आणि विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्रास देऊ नये, अशी भूमिका मांडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. असे असतानाही ग्रामीण भागात सक्तीच्या वसुलीच्या तक्रारी येत असल्याने संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी निवेदनात केली आहे.

WPL 2027 Auction Live: अमरावतीची लेक, Mumbai Indians च्या ताफ्यात! फ्रँचायझीने ऑलराउंडरसाठी किती रक्कम मोजली? RCB च्या WPL विजेत्या संघाची होती सदस्य

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये सहकार विभागाची अवैध सावकारीविरोधात धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल!

IND W vs ZIM W: भारतीय महिला संघाची विजयी हॅटट्रिक! ५ विकेट्स घेऊन झिम्बाब्वेचे कंबरडे मोडणारी Vaishnavi Sharma कोण?

Narendra Modi Post: ''बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या, मग काँग्रेसने किती जागा जिंकल्या?'', पंतप्रधान मोदींची पोस्ट, विरोधकांना चिमटा

Islapur News : रोडा नाईक तांडा येथील जिल्हा परिषद शाळा एकाच शिक्षकाच्या भरोशावर! २५ विद्यार्थ्यांचे चार वर्ग सांभाळताना शिक्षकाची कसरत

SCROLL FOR NEXT