Devidas Pingale, Uttamrao Khandbahale, Sanjay Tungar etc. while giving checks to the farmers. esakal
नाशिक

Nashik News: शेतकऱ्यांना मिळाले कष्टाचे पैसे; अडत्याच्या गाळा लिलावातून 44 लाख वसूल

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक बाजार समितीतील एका अडतदाराने टोमॅटोच्या मालापोटी १९६ शेतकऱ्यांचे दोन ते सव्वादोन कोटी रुपये थकविले होते. शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवरून बाजार समिती प्रशासनाने संबंधित अडत्याच्या गाळ्याचा लिलाव करीत ४४ लाख रुपयांना विक्री केला आहे.

गुरुवारी (ता. १७) ४५ शेतकऱ्यांना थकीतपैकी २० टक्के रक्कम परत करण्यात आली. कष्टाचे पैसे मिळाल्याने शेतकऱ्यांनी सभापती देवीदास पिंगळे व संचालक मंडळासह सचिव व बाजार समिती प्रशासनाचे आभार मानले आहेत. (Farmers got hard money 44 lakhs recovered from Adtya silt auction Nashik News)

या वेळी सभापती पिंगळे, उपसभापती उत्तमराव खांडबहाले, संचालक संजय तुंगार, तानाजी करंजकर, विनायक माळेकर, जगन्नाथ कंटाळे, प्रल्हाद काकड, हमाल मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम, व्यापारी प्रतिनिधी जगदीश अपसुंदे तसेच मनमाडचे माजी आमदार तथा मनमाड बाजार समितीचे सभापती संजय पवार उपस्थित होते.

पेठ रोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड येथे इन्कलाब व्हेजिटेबल कंपनीचे प्रोप्रायटर नौशाद फारुकी, शमशाद फारुकी यांना टोमॅटो विभागात गाळा क्रमांक १५१ हा ९९ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आलेला होता.

या अडत्याने जिल्हाभरातील जवळपास १९६ शेतकऱ्यांकडून टोमॅटो हा शेतीमाल वेळोवेळी घेतला आणि त्यांची शेतीमाल विक्रीची जवळपास दोन कोटी रुपये रक्कम थकविली. याबाबत अनेकदा मागणी करूनही शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळत नव्हती.

सभापती पिंगळे यांनी रक्कम परत करण्यासाठी पुढाकार घेतला. संबंधित गाळ्याचा जाहीर लिलाव ठेवला होता. ज्या शेतकऱ्यांचे सदर अडत्याने पैसे थकविले होते, अशा शेतकऱ्यांना आवश्यक दस्तऐवजांसह गुरुवारी बोलाविण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सदर गाळ्याच्या लिलावापोटी आलेली ४४ लाखांची रक्कम शेतकऱ्यांना धनादेशाद्वारे वाटप करण्याचे कामकाज सुरू आहे. गुरुवारी जवळपास ४५ शेतकऱ्यांना धनादेशाधारे २० टक्के रक्कम देण्यात आली.

याचप्रमाणे उर्वरित शेतकऱ्यांनाही देण्यात येणार आहे. कष्टाने पिकविलेल्या शेतमालाची अडत्याने थकविलेली रक्कम परत मिळेल, अशी अपेक्षा नसताना बाजार समिती सभापती व संचालक मंडळाच्या पुढाकाराने सदर रक्कम परत मिळाल्याने संबंधित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

"शेतकऱ्यांनी न डगमगता निःसंकोच आपला शेतमाल हा बाजार समितीतच आणावा. तसेच, कुठल्याही अडत्याकडे रक्कम थकल्यास लागलीच बाजार समितीत संपर्क साधावा."

- देवीदास पिंगळे, सभापती, नाशिक बाजार समिती

"शरदचंद्रजी मार्केट यार्डातील टोमॅटो विभागातील अडते नौशाद फारुकी व शमशाद फारुकी यांनी जवळपास १९६ शेतकऱ्यांचे दोन ते सव्वादोन कोटी रुपये थकविले आहेत. यापैकी बाजार समिती सभापती व संचालक मंडळाने पुढाकार घेत थकीत रकमेपैकी २० टक्के रक्कम परत मिळवून दिली. मात्र, बाजार समिती प्रशासकीय काळात आम्ही तक्रार केली होती. त्या वेळी योग्य कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करावी."

- सागर गायकवाड, शेतकरी, मखमलाबाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT